कादर खानचा मुलगा आहे हा प्रसिद्ध अभिनेता, या सुपरहिट चित्रपटात केले आहे काम!

Advertisement

.

जुने सिनेमे पाहिले की आपल्याला हसवणारे एक मोठे कलाकार म्हणजे आपले सर्वांचे लाडके कादर खान, आपल्या सहज सुंदर अभिनयाने पूर्ण विश्वभर त्यांनी आपले नाव कमावले आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यांचा अभिनय फक्त कॉमेडी पुरता मर्यादित न राहता आपल्या वेगवेगळ्या रोल मधून ते आपल्या समोर आले आणि आपली एक वेगळी छाप सोडून गेले.

Advertisement

कादर खान ह्यांनी जरी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले पण त्यांनी आपल्या मुलांना बजावून ठेवले होते की तुम्ही ह्या क्षेत्रात यायचं नाही तुम्ही आपली एक वेगळी ओळख निर्माण करा, तुम्हाला माझ्या नावाने न ओळखता मला तुमच्या नावाने ओळखले तर मी जास्त खुश होईल. पण त्यांचा मुलगा सरफराज खान ह्याने जेव्हा कॉलेज झाल्यानंतर आपल्या वडिलांना सिनेमात काम करायची इच्छा आहे असे सांगितल्यावर कादर खान खूप चिडले.

See also  सुशांतसिंह राजपूतवर येतोय "सु'सा'ई'ड ऑर म'र्ड'र" हा सिनेमा, हुबेहूब सुशांत सारखा दिसतो या सिनेमातील अभिनेता...

image post 23357 31122019 124615

Advertisement

त्यांनी खूप विरोध केला ह्या गोष्टीला पण सरफराज मात्र एका मतावर ठाम होते की मला बॉलीवुड मध्येच करीयर करायचे आहे. आणि म्हणूनच त्यांनी छोट्या मोठ्या सिनेमात काम करायला सूरवात केली. पण कादर खानचा मुलगा म्हणून लोक त्यांना ओळखत होती त्यामुळे ते खूप नाराज झाले पण जेव्हा सलमान खान सोबत त्यांनी चित्रपट केला तेव्हा त्यांच्या अभिनयाने सर्वांना भुरळ घातली.

तुम्हाला वाचून धक्का बसला असेल ना की सलमान खान सोबत काम केलं आहे आणि आम्हाला माहीत नाही पण खूप कमी लोकांना माहिती आहे की सलमानच्या तेरे नाम ह्या सिनेमात सरफराज ने त्याच्या जिगरी दोस्ताची भूमिका केली होती. आठवतोय का तो सिन जेव्हा सलमान पळून येतो आणि हाच मित्र त्याला पाहून चालत्या गाडीवरून उतरतो आणि जाऊन सलमानला मिठी मारतो.

See also  प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही करणार आहे लग्न, जाणून घ्या कोण आहे नवरदेव?
Advertisement

सर्फराज ने काही सिनेमे केले पण हवी तेवढी प्रसिद्धी त्यांच्या वाट्याला आली नाही. वॉन्टेड ह्या सिनेमात त्यांना तुम्ही शेवटचे पाहिले असेल आणि आता ते ह्या मायानगरी पासून दूर आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close