कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करणारी ‘ही’ तरुणी आज आहे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

‘स्व’प्न’ बहुतेक लोक पाहतात परंतु ते सत्यात उतरवण्याची खरी ताकद ही सर्वांमध्ये नसते. त्यासाठी जिद्द, चिकाटी व कठीण मेहनत घेण्याची गरज असते. आपल्या बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत स्वतःचे अस्तित्व बनवणे, हे वाटते तितके देखील सोपे नाही बरं का. त्यासाठी भरपूर तारेवरची कसरत ही प्रत्येक कलाकाराला करावीच लागते. अभिनेत्री काजल अग्रवाल ही साऊथ इंडस्ट्रीतील सुपरङुपरहिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

kajal

अप्रतिम सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय कलेच्या जोरावर तिने आपल्या फॅन्सच्या हृदयात जागा बनवली आहे. काजलने बॉलीवुडच्या मायानगरीत सुद्धा स्वतःचे नशीब आजमावून पाहिले. पण तिला हवे तसे यश काही मिळाले नाही. पण तरीही तिचे कित्येक चित्रपट हिट ठरले.

See also  काळजी करण्याचे दिवस संपले, भगवान श्रीशिवशंकर 5 राशींना देत आहेत सुख समृद्धी चे वरदान...

मागील अनेक वर्षांपासून अभिनेत्री काजल ही चित्रपट सृष्टीत कार्यरत आहे. तर आज देशातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून काजल अग्रवाल हिला ओळखले जाते. पण तुम्हांला ठाऊक आहे का, एक काळ असा होता की, जेव्हा काजल एक बॅकग्राऊंड ङान्सर म्हणून काम करत होती.

e6e9953d9a3fb8ed8e46887361b4380b

काजल अग्रवाल हिचा जन्म 1985 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच तिला बॉलीवुड इंडस्ट्रीचे अफाट आकर्षण होते. त्यामुळे कॉलेजमध्ये असताना तिने मॉडेलिंगकङे आपले पाऊल टाकले. मॉडेलिंगच्या माध्यमातून बॉलीवुड मध्ये एन्ट्री करता येईल, असे प्रयत्न तिचे सुरू होते.

त्या दरम्यान तिने अभिनय आणि ङान्स यांचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. हे शिक्षण सुरू असताना तिला एका तमिळ चित्रपटात बॅकग्राऊंड ङान्सर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेली संधी तिने मोठ्या उत्सुकतेने स्वीकारली.

See also  ऐश्वर्या रायमुळे पत्रकारांवर चिडल्या होत्या जया बच्चन, म्हणाल्या होत्या, 'ऐश्वर्या काय तुझी...'

त्यानंतर पुढे काजलला तमिळ, तेलुगु आणि मल्ल्याळम अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून काम मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आपल्याला चांगला अनुभव मिळेल, म्हणून यासाठी तिने ते काम आवर्जून स्वीकारले. कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता वेळप्रसंगी तिने मोफत काम सुद्धा केले. कारण तिला फक्त मोठ्या पडद्यावर झळकायचे होते. काजलच्या या जिद्दी स्वभावामुळे 2004 मध्ये तिला “क्यूं हो गया ना” या चित्रपटात झाकण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिने ऐश्वर्या रॉयच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

त्यानंतर “लक्ष्मी कल्याणम्” या चित्रपटात तिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. काजल अग्रवाल हिचा पहिलाच चित्रपट यशस्वी ठरला. त्यानंतर पुढे चन्दामामा, बोम्मलत्तम, गणेश जस्ट गणेश आणि पौरुङू अशा अनेक चित्रपटांत तिला काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. मात्र “मगधीरा” आणि “आर्या 2” या चित्रपटांनी तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिली. तर आज अभिनेत्री काजल अग्रवाल ही भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

See also  बायको डिंपलच्या भांडणाला कंटाळून राजेश खन्ना करणार होते आ'त्म'ह'त्या, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

ELqdiDvUUAAAQb

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment