ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री या उद्योगपती सोबत अडकणार लग्न बंधनात, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल 30 ऑक्टोबरला लग्न करणार आहे. तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

तिने सांगितले की ती मुंबईत होणाऱ्या एक प्राइवेट समारोहत गौतम किचलूबरोबर लग्न करणार आहे. या आनंदाच्या बातमीच्या निमित्ताने तिने चाहत्यांकडून आशीर्वादांची इच्छा व्यक्त केली आहे.

null

तिच्या पोस्टमध्ये काजलने लिहिले की, ‘मी हो म्हटलं आहे… मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की 30 ऑक्टोबर 2020 रोजी मी मुंबईत गौतम किचलूसोबत लग्न करणार आहे. या खासगी व छोट्या सोहळ्यामध्ये फक्त आमच्या कुटुंबातील सदस्यच सहभागी होतील.’

See also  'मैने प्यार किया' चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने पळून जाऊन केले होते लग्न, कारण विश्वासच बसणार नाही...

‘या महामारीने निश्चितच आमचा आनंद नक्कीच थोडा ओसरला आहे, परंतु एकमेकां सोबत आपले जीवन सुरु करण्यास आम्हाला आनंद झाला आहे आणि आपण सर्व देखील आमच्यासाठी खूप उत्सुकता आहे हे मला माहित आहे.’

‘गेल्या बऱ्याच वर्षांपासून आपण माझ्यावर खूप प्रेम केले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे. आम्हाला या अविश्वसनीय नवीन प्रवासाबद्दल तुमचे आशीर्वाद हवे आहेत. मी पुढेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहील, परंतु एक नवीन हेतू आणि अर्थासोबत आहे. तुमच्या कधीही न संपणाऱ्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.’

 

View this post on Instagram

 

♾🙏🏻

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on


लग्नाची घोषणा करण्यापूर्वी काजल या पोस्टसंदर्भात चर्चेत आली आहे. एका रिपोर्ट्सनुसार गेल्या महिन्यात या दोघांची एंगेजमेंट झाली होती.

See also  नेहा कक्कर व रोहनप्रीत मध्ये झाले कडाक्याचे 'भां'डण', व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल...

रिपोर्ट्सनुसार, गौतम किचलू हा एक मोठा बिझनेसमॅन असून तो इंटेरिअर डिझाईन आणि होम डेकोर सजावटीशी निगडित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘डेझरन लिव्हिंग’ या कंपनीचा मालक आहे. तर अभिनेत्री काजल अग्रवाल सिंघम, स्पेशल 26, मगाधीरा अशा चित्रपटांमध्ये दिसली आहे.

kajal agarwal gautam kitchlu e1601980171549

काजल लवकरच कमल हासनच्या ‘इंडियन 2’ चित्रपटात दिसणार आहे. या व्यतिरिक्त काजलकडे दलकीर सलमान आणि आदिती राव हैदरी यांचा ‘हे सिनामिका’ हा चित्रपट देखील आहे. काजल अग्रवाल हिने 2004 मध्ये ‘क्यूं! हो गया ना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड विश्वात पदार्पण केले होते.

null

काजलच्या लग्नाबाबत बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. काही वेळा लग्नाच्या बातम्या आल्या आणि हवेतच विरून गेल्या, पण काजलने त्यांच्यावर कधीही स्पष्टीकरण दिले नाही. यावेळी काजलने स्वत: व्यावसायिका गौतम किचलू यांचे नाव उघड केले आहे. काजल गौतमशी लग्न करणार आहे. गौतम व्यवसायाने उद्योजक इंटिरियर डिझाइनर आहेत.

See also  अभिनेत्री करीन कपूर प्रेग्नंसीच्या शेवटच्या महिन्यातील फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment