अभिनेत्री काजोलचे मुंबईमधील घर आहे खूपच आलिशान, लंडन मध्येही आहे ५४ कोटींचे घर, संपूर्ण संपत्ती आहे एवढी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

ज्या अभिनेत्री आणि अभिनेत्याने 90 च्या दशकापासून आपल्या कामाचा इस्ट्री मध्ये दबदबा सुरू केला त्या दोघांच्या सुखी संसाराला अनेक वर्षं लोटलेली आहेत. त्यांनी मैत्री केली. मग मैत्री प्रेमात आणि मग लग्नात. त्यातल्या एका अभिनेत्री चा वाढदिवस आहे. जिचं नाव आहे काजोल. होय आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे अजय देवगण. तर या निमित्ताने त्यांच्या करोडमय लाईफ ची सफर करून येणार आहोत. चला सविस्तर जाणून घेऊयात.

हिंदी चित्रपटसृष्टीची सशक्त अभिनेत्री असलेल्या काजोलने अभिनय विश्वात खूप जोरदार प्रवेश केला होता. काजोलच्या पहिल्या चित्रपटाने विशेष काही केले नाही पण त्यानंतर तिने एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट दिले. शाहरुख खान हा तिचा आवडता सहकलाकार होता. काजोलने तिचा पहिला चित्रपट साइन केला तेव्हा ती 16 वर्षांची होती.

ajay kajol marriage

ती शाळेत शिकत होती पण चित्रपटांतील करिअरमुळे तिने तिचा अभ्यास मध्यावरच सोडला. काजोल आज तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता अजय देवगणसोबत 4 वर्षांच्या दीर्घ संबंधानंतर तिने लग्न केले. 24 फेब्रुवारी 1999 रोजी दोघांनी लग्न केले.

See also  या व्यक्तीने जेनेलियाच्या कानशिलात लावली होती, म्हणून तब्बल 13 वर्षांनी रितेश देशमुखने घेतला बदला...

काजोलचे घर पॉश भागात आहे, काजोल पती अजय देवगण, मुलगा युग आणि मुलगी न्यासासोबत मुंबईच्या पॉश जुहू भागात राहते. तिचं घर खूप मोठं होतं. जिथं आलिशान महालात राहिल्या सारखा फील होत असेल असेच फोटो पाहून वाटतं.

अजय देवगण आणि काजोलच्या बंगल्याचे नाव शिवशक्ती आहे. हा बंगला आतून आणि बाहेरून खूप सुंदर दिसतो. तिच्या घराच्या भिंती पांढऱ्या आहेत तर लाकूडकाम खूप चांगले केले गेले आहे.

Ajay Devgn and Kajol

काजोलच्या या बंगल्यात जिम, स्विमिंग पूल, मिनी थिएटर, लायब्ररी आणि स्पोर्ट्स रूम देखील आहेत. अजय देवगण आणि काजोल हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अतिशय प्रेमळ लोक आहेत. दोघांनाही कुटुंब हे प्रथम प्राधान्य आहे. आणि घरीच सोबत ते जास्त वेळ घालवतात.

काजोलच्या घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर आहे. पांढऱ्या रंगाचे फर्निचर आणि हलके रंगाचे पडदे त्यांच्या घराला साधे आणि मोहक स्वरूप देतात. काजोल हायफाय होण्याचे टाळते आणि तिचा साधेपणा चाहत्यांना भुरळ घालतो.दोघांच्या घराचे दृश्यही त्यांना या व्यक्तिमत्त्वाची जाणीव करून देते. कारण त्यांचं घर राजवाड्या सारखे आहे.

घराचा जिना हॉलचा परिसर आणखी प्रेक्षणीय बनवतो. काजोलने या शिडीवर बसलेली स्वतःची अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत, जी तुम्ही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहू शकता. या बंगल्यात चार बेडरूम आहेत. एका मुलाखतीत काजोलने याबद्दल सांगितले होते की आम्ही खूप भाग्यवान आहोत की घरात चार बेडरूम आहेत. सर्व शयनकक्ष प्रत्येकाच्या आवडीनुसार डिझाइन केलेले आहेत. आणि आम्ही आमच्या आयुष्यात घरी खूप सुखी आहोत.

See also  अभिनेत्री रेखा सोबत 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याने केली होती जबरदस्ती, त्यानंतर जे घडले ते...

iDiva Kajol Ajay Devgan Home Shivshakti THUMB 5f044f417266c

जेवणाच्या भागात काचेचे काम खूप वापरले गेले आहे. अजय देवगण आणि काजोलने भिंतींच्या फ्लोअरिंगसाठी पांढऱ्या रंगाची निवड केली आहे. जरी सिंघमची कृती आणि रागातला अवतार चित्रपटांमध्ये दिसत असला तरी वैयक्तिक आयुष्यात तो खूपच डाउन टू अर्थ व्यक्ती आहे. फक्त घर आलिशान आहे. मन मात्र सर्वसामान्य आणि साधं आहे. तुमच्या आमच्या सारखं.आता या घराच्या फ्लोअरिंगवर एक नजर टाका, ते किती सुंदर आहे. काजोल आणि अजय यांनी अलीकडेच जुहूच्या पॉश सोसायटीमध्ये 60 कोटी रुपयांचा नवीन बंगला खरेदी केला आहे. जो बंगला पाहून आपण थक्क व्हाल. सेलिब्रिटी लोकं हे नेहमी काही न काही खरेदी करत असतात.

काजोल ही अभिनेत्री नेहमीच हाय-फाय असणं टाळते. आणि तिचा साधेपणा चाहत्यांना भुरळ घालतो. फिल्म स्टार काजोलने तिच्या घराच्या अनेक कोपऱ्यात अतिशय सुंदर चित्रे क्लिक केली आहेत. जी घराची खूप शोभा वाढवतात.

See also  या धक्कादायक कारणामुळे सैफ अली खानने केले होते अभिनेत्री करीना कपूरशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

kajol and ajay devgn

एका अहवालानुसार, तुमच्या माहिती करिता अजय आणि काजोल यांचे लंडनमधील पार्क लेनमध्ये एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत 54 कोटी रुपये आहे.बघितलं का किती महागड्या घरात राहतात. दोघे. काय असतं मनोरंजन क्षेत्रात पैसे खूप आहेत. त्यामुळे हे सेलिब्रिटी लोकं वेगवेगळ्या ठिकाणी घर किंवा इनव्हेसमेंट करत असतात.

तर आज काजोल च्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही आपल्याला तिच्या घराचा प्रवास दाखवला. पण जिच्या निमित्ताने दाखवू शकलो त्या काजोल ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment