काजोलने शेयर केले आपल्या सक्सेसफुल करियर मागील सिक्रेट, हे ऐकून तर तुम्ही देखील थक्क व्हाल!
“अपयश ही यशाची पहिली पायरी असते.” प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. जिद्द व धैर्य ठेवून अतोनात कष्ट घेतल्याशिवाय कुणालाही फळ मिळत नाही. परंतु काही लोक मात्र स्वतः मेहनत न करता फक्त नशिबाला दोष देतात. आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील असेच अनेक स्टार्स आहेत. ज्यांनी स्वतःच्या आत्मविश्वासाने आणि कठोर परिश्रमांनी आपल्या करियरमध्ये सक्सेस मिळवले आहे.
अभिनेत्री काजोल ही देखील अशीच एक फेमस अभिनेत्री आहे. काजोलने “बेखुदी” या चित्रपटापासून आपल्या करियरला सुरूवात केली होती. तब्बल तीस वर्षांपासून अभिनेत्री काजोल ही फिल्म इंडस्ट्रीचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे.
तिने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. काजोलने आपल्या एका मुलाखतीमध्ये स्वतःच्या करियरची सुरुवात, तिने केलेला संघर्ष व तिने मिळविलेले यश याबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे.
काजोल म्हणते की, “आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर निघणे, ही काही साधी गोष्ट नाही. त्यापेक्षा जास्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. कारण तुम्ही स्वतःवर जितका विश्वास ठेवणार, तितकाच विश्वास जग तुमच्यावर ठेवणार.” काजोल पुढे म्हणते की, “मी खूपच नशीबवान आहे. आपण सर्वजण प्रत्येक गोष्ट करू शकतो फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज असते.
जर मी माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आले नसते तर मी आज जिथे आहे, तिथे कदाचित मी पोहोचले नसते. मी फक्त पुढे चालत राहिले आणि माझे काम करत राहिले. मी माझे करियर भविष्यात कसे उत्कृष्ट बनवू शकेल, याचाच विचार मी सतत करत असायचे. मागील सर्व जुन्या गोष्टी मी मागेच सोडून दिल्या आणि करियरमध्ये पुढे जाण्याचे मार्ग शोधत राहिली. लोक देखील तुमच्यावर तेव्हाच प्रेम करतात, जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता.
अभिनेत्री काजोल म्हणते की, मी आज जी काही आहे. जशी आहे, कारण मी स्वतःला खूप लाईक करते. हे देखील तितकंच खरं आहे की, मला हे सर्व काही मिळवण्यासाठी बराच कालावधी लागला. परंतु मी कधीच थांबली नाही. मी जशी आहे, तशी मी मला खूप आवडते.
माझे केस सुंदर आहेत, मी झिरो फिगर नाही. पुढे भविष्यात मी अनेक ङायरेक्टर सोबत काम करण्यास इच्छुक आहे. कदाचित माझ्या मधील त्या सर्व गोष्टी ते बाहेर काढू शकतील, ज्या याआधी कधी आल्या देखील नसतील. काही नवीन करण्यात आणि खूप नवीन काही शिकण्यासाठी मी नेहमीच तयार असते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.