कधी आहे यंदाची कालभैरव जयंती? कालाष्टमीची तारीख, मुहूर्त, महत्व, कथा, पूजनविधी, इ. जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काल भैरव जयंती : प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीवर म्हणजेच कालाष्टमीला साजरी केली जाते. शास्त्रानुसार भगवान कालभैरव यांचा जन्म मार्गशीर्ष कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला झाला होता. यावर्षी ही तारीख ७ डिसेंबर २०२० रोजी पडत आहे. म्हणून यावर्षी काल भैरव जयंती ७ डिसेंबर रोजी साजरी केली जाईल.

काल भैरव पूजन शुभ मुहूर्त : कालाष्टमी तिथि प्रारंभ – दि. ७ डिसेंबर सायंकाली ६ : ४७ वाजल्यापासून तर कालाष्टमी तिथि समाप्ती दि. ८ डिसेंबर सायंकाली ५:१७ वाजेपर्यंत.

काल भैरव पूजन महत्व : काल भैरव जयंतीच्या दिवशी भगवान काल भैरव यांची विधिने पूजा केली जाते. काल भैरव जी यांना काशीचा कोतवाल म्हणतात. असा विश्वास आहे की काशी येथील प्रत्येक व्यक्तीला येथे राहण्यासाठी बाबा काल भैरवची परवानगी घ्यावी लागते की त्यांची नेमणूक खुद्द भगवान शिव यांनी कोतवाल म्हणून केली होती.

काल भैरव कथा : शिव पुराणानुसार, एकदा ब्रह्मा, विष्णू आणि भगवान शिव यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे याबद्दल वाद झाला. दरम्यान, ब्रह्माजींनी भगवान शंकरांचा अ’प’मा’न व नि’षे’ध केला, ज्यामुळे भगवान शिव खूप क्रोधित झाले. भगवान शिवांनी क्रो’धात काल भैरवाला उत्पन्न केले. भगवान शिव शंकरांच्या अ’प’मा’ना’चा बदला घेण्यासाठी काल भैरवाने आपल्या नखाने ब्रह्माजीनी ज्या मुखाने भगवान शिवांचा अ’प’मा’न केला होता ते एक मुंडकेच का’प’ले.

See also  पंतप्रधान मोदींजींचे हे विशेष विमान आहे अभेद्य, त्याची किंमत आणि एका तासाच्या प्रवासाचा खर्च ऐकून थक्क व्हाल!

त्याने भगवान शिव यांच्या अ’प’मा’ना’चा बदला घेतला परंतु त्याच्यावर ब्र’ह्म’ह’त्या केल्याचा आ’रो’प झाला व त्याला ब्रा’म्ह’ह’त्येचे पा’त’क लागले. ब्रह्मह’त्येच्या पा’पातून मुक्तीसाठी भगवान शंकरांनी काल भैरवाला पृथ्वीवर जाऊन प्रा’य’श्चि’त करण्यास सांगितले आणि सांगितले की जेव्हा ब्रह्मा जीचे तु’ट’ले’ले मुं’ड’के काल भैरवाच्या हातातून आपोआप पडेल, त्याच वेळी ब्रह्मह’त्येच्या पा’पातून त्याला मुक्ती मिळेल. शेवटी काशी येथे ब्रम्हाचे मुं’ड’के प’डू’न काल भैरवचा प्रवास संपला आणि मग येथेच त्यांची स्थापना झाली आणि शिवकृपेने ते कोतवाल बनले.

काल भैरव पूजन विधी : या दिवशी भगवान शिवरुपी काल भैरवची पूजा करणाऱ्या भाविकांस विशेष शुभफल प्राप्ती होते.

कालाष्टमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये जागे व्हा. शक्य असल्यास गंगा स्नान करा. शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत .

See also  तृतीयपंथीयांना बुधवारीच दानधर्म का करतात? किन्नरांना दान करताना चुकूनही करू नका ही चूक नाही तर...

भैरवला प्रसन्न करण्यासाठी उडीद डाळ किंवा त्यापासून बनवलेली मिठाई, जसे की इम्रती, गोड पुरी किंवा खीर दिली जातात. चमेलीची फुले त्यांना खूप प्रिय आहेत.
कालिका पुराणानुसार भैरवजींचे वाहन एक काळा कुत्रा आहे, म्हणून काळ्या कुत्र्याला गोड पदार्थ खाऊ घातल्याने या दिवशी काळ भैरवाची विशेष कृपा होते.
कालाष्टमीला कालभैरवाच्या पूजेबरोबरच भगवान शिव, माता पार्वती आणि संपूर्ण शिव परिवाराचीही पूजा करावी.

भगवान काल भैरवाला प्रसन्न करण्यासाठी, या दिवशी कालभैरव अष्टक पठण करावे, असे केल्याने सर्व रोग दुःखे इ. दूर होतात. या दिवशी भगवान कालभैरवांना ७ किंवा ११ लिंबाची माळ अर्पण केल्यास सर्व त्रासांपासून मुक्तता होते. पूजनानंतर गरजू गरिबांना प्रसाद दान करा. काल भैरवला प्रसन्न करण्यासाठी, काल भैरव अष्टमीच्या दिवशी पापड, पुरी आणि पकोडा यासारखे तेलकट पदार्थ देवाला अर्पण करा. यानंतर, त्या गरीब आणि गरजू लोकांमध्ये दान द्या. असे केल्याने आपणास भगवान काल भैरवची विशेष कृपा प्राप्त होईल.

See also  ज्या पुरुषांमध्ये असतात हे गुण, त्या पुरुषांच्या प्रेमात वेड्या होतात महिला, जाणून घ्या कोणते आहेत ते गुण...

काल भैरव अष्टमीच्या दिवशी, साधकाने भगवान काल भैरवच्या मंदिरात आरती करावी आणि परमेश्वराला पीत वस्त्रं, पिवळा झेंडा अर्पण करावा.
काल भैरवची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी, काल भैरव अष्टमीच्या दिवशी त्यांना ५ लिंबू अर्पण करा. जर आपण हा शुभमुहूर्त गमावला असेल तर आपण हेच सलग ५ गुरुवार पर्यंत करू शकता. भगवान विश्वनाथ हा काशीचा राजा आणि काल भैरव या शहराचा कोतवाल मानला जातो. या कारणास्तव काशी विश्वनाथला भेट देणाऱ्या भाविकांनी कालाभैरवांचे दर्शन घेतले पाहिजे.

काल भैरवांचे चमत्कारी सिद्धमंत्र :

ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाचतु य कुरु कुरु बटुकाय ह्रीं ॐ॥
॥ॐ भैरवाय नम:॥
‘बटुकाख्यस्य देवस्य भैरवस्य महात्मन:। ब्रह्मा विष्णु, महेशाधैर्वन्दित दयानिधे॥’
॥ऊं भ्रं कालभैरवाय फ़ट॥
|| ॐ भयहरणं च भैरव: ||

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment