या चमत्कारी काळभैरव मंदिरात देवाला देतात चक्क दा’रूचा नैवैद्य आणि काही क्षणांत संपते दा’रु, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

भगवान शंकराचाच एक अवतार असलेल्या काळभैरव यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला झाल्याचा उल्लेख हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये आहे. असे म्हणतात की काळ भैरव यांना जर दा’रु अर्पण केली तर ते आपल्या भक्तांचे दुः’ख दूर करुन सर्व इच्छा पूर्ण करतात.

तसे पाहायला गेले तर काळभैरव मंदिरं भारतात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्रांमध्ये स्थापित आहेत. भगवान महाकाळेश्वर यांची नगरी समजली जाणाऱ्या मध्यप्रदेशातील उज्जैन शहरात क्षिप्रा नदीच्या काठावर काळभैरव यांचे हे चमत्कारी मंदिर वसलेले आहे.

येथे काळभैरव देवाला दररोज भविकांतर्फे दा’रुचा नैवैद्य अर्पण केला जातो. दररोजची पूजा-अर्चा झाल्यावर दा’रु एका भांड्यात ठेवून ते भांडे काळभैरव यांच्या मुखासमोर ठेवले जाते. काही क्षणांतच भांड्यामधील दा’रु संपलेली दृष्टीस पडते.

काळभैरव यांचे हे आश्चर्यकारक मंदिर “वाममार्गी तांत्रिक मंदिर” देखील मानले जाते. असे म्हटले जाते की, प्राचीन काळी फक्त तांत्रिक साधकांनाच या काळभैरव मंदिरात जाण्याची परवानगी होती, सर्वसामान्यांना त्या काळात मंदिरात प्रवेश करण्यास म’ना’ई होती. काही वर्षांपूर्वीपर्यंत या मंदिरातील यज्ञात जनावरांचा बळीसुद्धा दिला जात असे, परंतु आता ती यज्ञ प्रथा पूर्णपणे बं’द करण्यात आलेली आहे.

असे मानले जाते की, काळभैरव यांची विधिवत पूजा करून त्यांना दा’रु अर्पण केल्यास ते त्यांच्या भक्तांच्या समस्या निवारण करून त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. काळभैरव जयंतीच्या दिवशी जे भक्त काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून, काळ्या रंगाच्या आसनावर बसून, दक्षिण दिशेला तोंड करून २५१ वेळा काळभैरव मंत्र जपतात, आणि त्यानंतर काळभैरवाला दारुचा नैवैद्य अर्पण करतात, श्रीमहाकाळ त्यांची सर्व दुः’खे न’ष्ट करून, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात.

श्री काळ भैरव मंत्र – ” ॥ ऊँ भ्रं काळभैरवाय फ़ट।।”

आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की, देवाला दा’रू कशी अर्पण केली जाते ? यामागे काही शास्त्र आहे कि ती केवळ एक प्रथा आहे ? त्यांच्यासाठी शंका निरसन म्हणून सांगावेसे वाटते की. काळभैरव हा साक्षात भगवान शिवाचा अंशावतार आहे. त्यामुळे शिवाप्रमाणेच काळभैरवाकडेही उत्पत्ती, स्थिती आणि लय यांपैकी लयाचे म्हणजेच विनाशाचे कार्य आहे.

भगवंत जेव्हा एखाद्या गोष्टीचा वि’ना’श करतो, तेव्हा एकप्रकारे तो त्या गोष्टीचा उद्धारच करत असतो. या विनाश कार्यासाठी देवालाही तमोगुणाची आवश्यकता असते. सर्व देवता या सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या पलीकडे गेलेल्या असतात. मग वि’ना’श करण्यासाठी काळभैरवातील तमोगुण जागृत ठेवणे गरजेचे असते.

आणि म्हणूनच त्याला तमोगुणी असलेली दारु अर्पण केली जाते. महत्वाचं म्हणजे देवतांचा तमोगुण हा शुद्ध तमोगुण असतो. भगवंत त्रिगुणापार असल्याने त्याचे तमोगुणावर आधिपत्य असते. त्यामुळे दा’रुतून उत्पन्न झालेल्या तमोगुणाचा उपयोग तो वि’ना’शाचे तत्त्व जागृत ठेवून वा’ई’ट शक्तींपासून सृष्टीसीमेचे रक्षण करण्यासाठी करतो.

आपल्या माणसाच्या तमोगुणात मात्र नाना विकार असतात. त्यामुळे मनुष्य जर दा’रु प्यायला, तर तिच्यातील तमोगुण कंट्रोल न झाल्याने त्याचा स्वतःचाच वि’ना’श ओढवतो. देव देवतांचे वर्तन हे सामान्य माणसांसारखे होत नाही. असे धर्म सांगतो. त्यामुळे, ” देवाला दा’रू कशी अर्पण करायची ?” हा शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक विचार झाला. त्रिगुणाच्या पार झालेल्या भगवंताला त्याच्या कार्यानुसार नैवैद्य म्हणून दा’रु अर्पण करू शकतो.

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे. शुभं भवतु: !

Leave a Comment