“माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या तर मी पद्मश्री पुरस्कार माघारी देईल…” कंगनाने दिले खुले आव्हान

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कंगना राणावत ही अभिनेत्री सदा न कदा वादग्रस्त विधान करण्यासाठीच चर्चेत असते. आजवर आपण पाहत आलेलो आहोतच. त्यामुळे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. नुकताच कंगना ला राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे सुद्धा ती बरीच ट्रोल झाली होती. कारण अनेकजण सोशल मीडियावर म्हणाले की, ” लायकी नसताना दिला. तिला देण्याची काय गरज ? आणि वगैरे वगैरे. पण कंगना पुरस्कार घेऊन गप्प सुद्धा बसली नाही. वादग्रस्त वक्तव्य करून बसली.

ती म्हणाली, ” 1947 ला काही स्वातंत्र्य मिळालेलं नाही. खरं 2014 ला मिळालेलं आहे. आता यावर लोकं कशाला शांत बसतील. तेव्हापासून जे हे प्रकरण पेटले आहे ते अजूनही विझता विझेना. तिने वादग्रस्त वक्तव्यात म्हंटलं होतं की हे स्वातंत्र्य 1947 चं भिख मागून मिळालेलं आहे.

See also  ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, अभिनेत्रीने स्वतः सांगितली लग्नाची तारीख...

तिला सोशल मीडियावर खूपदा ट्रोल करण्यात आलं. अजूनही करत आहेत. कारण वक्तव्य तस चुकीचे आहे. तिचा पुरस्कार मागे घेण्याची सुद्धा खूप चर्चा झाली त्याचसोबत तिने सर्व स्वातंत्र्य संग्रामात वीर मरण पत्करलेल्या शहिदांच्या घरच्यांची माफी मागावी. अशी देशभरातल्या सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.

आणि मग पुढं जावं. पण याबाबत माफी तर सोडा कंगना ने भलतंच बच्चन गिरी केली आहे. ती म्हणते की 1857 च हाच एकमेव खरा लढा होता. जो झाशीच्या राणीच्या आयुष्यातला खरा लढा होता.

आणि इतरांचा सुद्धा; पण 1947 ल भीख नाही मागितलं तर काय ? असं बरंच काही कंगणा बोलली. आता या मुद्द्यावरून देशभरात संतापाची लाट पसरली. कारण हे वक्तव्या खुळ्याच्या तोंडचं वाटतं. बरं एवढं सगळं होऊनही माफी ती मागत नाही आहे. ती म्हणते की 1947 ला काय झालं होतं हे जरा मला लोकांनी सांगावं मग च मी पण पुरस्कार मागे घेईन.

See also  या बॉलिवूड ज्योतिषीने आपल्या लग्नासाठी ठेवली आहे अशी विचित्र अट की, ऐकून विश्वासच बसणार नाही...

कंगना राणावत ही एक उत्तम अभिनेत्री आहे. पण कामापेक्षा ती अश्याच अनेक गोष्टी साठी चर्चेत असते. कधी महाविकास आघाडी सरकार किंवा शिवसेना विरुद्ध काहीही बोलते तर कधी उगाच चर्चेत येणारं वक्तव्य करते. नुकत्याच केलेल्या तिच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती आता चांगलीच अडकलेली चिन्ह दिसत आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment