16 वर्षांत इतकी बदलली आहे “कांटा लगा” फेम अभिनेत्री, या अभिनेत्यासोबत दुसरे लग्न करून बॉलीवूड पासून राहते दूर…
“काटा लगा…” हे गाणे तर तुम्ही- आम्ही सर्वांनी ऐकलेच आहे. या गाण्यामुळे प्रसिद्धीत आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला ही सध्या आपल्या अभिनयाच्या जगापासून लांब आहे. परंतु तरीही ती आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडलेली आहे.
नुकतेच शेफाली जरीवाला हिने आपल्या पतीसोबत काही रोमॅन्टिक फोटोज् शेयर केले आहेत. यामध्ये ती आपला पती पराग याच्यासोबत स्विमिंग पूल मध्ये मस्ती करताना दिसत आहे. त्या दोघांचेही हे फोटोज् त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. त्यामुळे ते या फोटोंवर खूप लाईक्स व कमेंट्स करत आहेत.
2004 मध्ये शेफालीने मीत ब्रदर्स मधील हरमीत सिंह सोबत लग्न केले होते. पण लग्नाच्या 9 वर्षांनंतर शेफालीने हरमीत पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांचेही नाते खूप वाईट पद्धतीने संपले. त्यानंतर शेफालीने हरमीत वर अतिशय गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर 2014 मध्ये शेफाली जरीवाला हिने पराग त्यागी यासोबत लग्न केले. परागने आतापर्यंत कित्येक मालिकांमध्ये काम केले आहे. “ब्रह्मराक्षस” ह्या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. तेव्हापासून त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.