“मुंबईत राहून सुद्धा तुला मराठी येत नाही” अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला चांगलेच सुनावले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सुप्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा “द कपिल शर्मा” शो हा नेहमीच सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरतो. या शो च्या सेटवर नेहमी वेगवेगळे सेलिब्रिटीज हे आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी आणि नव्या शो च्या प्रमोशनसाठी हजेरी लावताना दिसतात. कपिल शर्मा सुद्धा त्यांच्यासोबत खूप धम्माल आणि मस्ती करताना दिसतो. परंतु सध्या सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओजमुळे काही वेगळचं चित्र पाहायला मिळत आहे.

मराठमोळी नामांकित अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने कपिल शर्माला मराठी बोलता येत नाही, म्हणून चांगलंच सुनावलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. सोनी टिव्हीने नुकतंच रिलीज केलेल्या नवीन प्रोमो मध्ये अभिनेता रवि किशन, सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावल्याचे पाहायला मिळते.

कपिल शर्मा यामध्ये ह्या सर्वांचे स्वागत करताना दिसत आहे. याचदरम्यान सोनाली कुलकर्णी कपिल शर्माला म्हणते की,”एवढ्या सगळ्या चित्रपटांत काम करून सुद्धा याआधी मला ह्या सेटवर येण्याची संधी मिळाली नाही.” यावर कपिल म्हणतो की,”तू इथे आलीस, हेच आमचं सौभाग्य आहे.”

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेता सुयश टिळकचा झाला या अभिनेत्री सोबत साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी?

कपिलच्या याच बोलण्यावर प्रतिक्रिया देताना सोनाली कपिलला म्हणते की, “कपिल तू फक्त हिंदी आणि इंग्लिश मध्ये बोलणार आहेस का? थोडं तरी मराठी मध्ये बोल.” यावर कपिल म्हणतो की, “त्याला मराठी बोलता येतच नाही.” कपिलच्या या बोलण्यावर सोनाली ताबडतोब उत्तरली की,”मुंबईत राहून सुद्धा तुला चक्क मराठी येत नाही. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना खूप चांगलं मराठी येतं.” त्यानंतर कपिल पंजाबी बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो की,”सोनाली तू केव्हापासून बोलते, मला बोलायची संधी सुद्धा देत नाहीस.”

यावर सोनाली कुलकर्णी म्हणते की,”तू जिथे राहतो, तेथील भाषा तुला यायला हवी.” सोनालीचे बोलणे मध्येच थांबवत कपिल म्हणतो की, मी तुझ्या मताशी सहमत आहे. कपिल शर्मा शो मध्ये हे सर्व कलाकार “व्हिसलब्लोअर” च्या प्रमोशनसाठी आले होते. तेव्हा सर्वांवर भारी पडणाऱ्या कपिलवर आपली मराठमोळी सोनालीच भारी पडली होती.

See also  हातात गुलाबाची फुलं, चेहऱ्यावर हास्य! सारा तेंडुलकरने शेअर केले फोटो, पहा नेटकरी काय कमेंट करत आहेत...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment