प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने केले होते ‘गदर’ या सुपरहिट चित्रपटात काम, पण ऐनवेळी या कारणामुळे का’पला तो सीन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आज जो विनोदी अभिनेता करियर मध्ये यशाच्या शिखरावर आहे त्याच्या बद्दल काही गोष्टी अनेक वर्षांच्या नंतर बाहेर आल्यावर चाहत्यांना, प्रेक्षकांना तुम्हाला आम्हाला अवाक करण्यासारख्याच. हिंदी मधील एक प्रसिद्ध विनोदी अभिनेत्याला गदर या सिनेमात घेतलं होतं पण काही कारणांमुळे सिन का’प’ण्या’त आला. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की तो कोण ? अहो कपिल शर्मा. ( kapil sharma ) झालात ना अवाक. एक उत्तम असा अभिनेता ज्याने आज लोकप्रियता मिळवलेली आहे. तर नेमकं काय आहे हे प्रकरण चला सविस्तर जाणून घेऊ.

लोकप्रिय हिंदी कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने ( kapil shrma ) आजवर त्याच्या विनोदांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. कपिल शर्माचे आज लाखो चाहते आहेत. अनेक कॉमेडी शोमध्ये सहभाग घेत कपिलने चाहत्यांची पसंती मिळवली. त्यानंतर अखेर स्वत:च्या नावाने शो सुरु करत कपिलने यशाचं शिखर गाठलं आहे. मात्र त्याच्या या प्रवासात त्याला अनेक अडथळे देखील आले होते. सुरुवातीच्या काळात कपिलने बराच संघर्ष केला आहे.

See also  बनावट बिलिंगमध्ये अभिनेते सोनू सूदची मदत, बोगस कंपन्यांचे संचालक म्हणून बनवले शिपाई, जाणून धक्का बसेल...

संघर्ष सुरुवातीला हा सगळ्यांनाच करावा लागतो तसा कपिल ने ही केलाच. त्याने शेवटी यश मिळवलच. पण दरम्यान च्या काळात त्याच्या संघर्ष मय प्रवासातील एक गोष्ट आहे. जी त्याला सनी देओल ( sunny devol ) च्या गदर शी जोडते.

navbharat times

अनेकांना या गोष्टीची कल्पनादेखील नसेल पण कपिल शर्माने सनी देओल आणि अमिषा पटेलच्या सुपरहिट ठरलेल्या ‘गदर- एक प्रेम कथा’ या सिनेमात काम केलं होतं. मात्र कपिलच्या एका वर्तनामुळे त्याचा सिनेमातील सीन कट करण्यात आला होता. ‘द कपिल शर्मा शो’ च्या एका भागात अभिनेता सनी देओलने हजेरी लावली होती. या खास भागात कपिलनेच या गोष्टीचा खुलासा केला होता.

कपिल ने सांगितले की पाजी आज तुम्ही या शो मध्ये आहात पण एकेकाळी मी आपल्या चित्रपट गदर मध्ये होतो पण सिन कापण्यात आला. बघितले नशीब माणसाला कुठून कुठं घेऊन जाऊ शकत.

kapil sharma would have been a part of gadar had his scene not been cut out 001

पुढे कपिल शर्मा या शोमध्ये म्हणाला की जेव्हा अमृतसरमध्ये ‘गदर’ सिनेमाचं शूटिंग सुरु होतं तेव्हा एक अफवा पसरली होती. जो कुणी या शूटिंगमध्ये सामिल होईल त्याला सनी देओलला भेटण्याची संधी मिळेल अशी ती अफवा होती. त्यामुळे कपिल शर्मा शूटिंगच्या ठिकाणी पोहचला. मात्र तेव्हा त्याला कळालं की त्या दिवशी अमरीश पुरी आणि अमीषाचा फक्त सीन होता. दुसऱ्या दिवशी कपिल पुन्हा मित्रासह शूटिंगला पोहचला.

See also  एकेकाळीच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर क'र्क'रो'गाच्या उपचारासाठी आली भीक मागण्याची वेळ, अवस्था पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल...

कपिल आणि त्याच्या मित्राला एका सीनमध्ये घेण्यात आलं. यात त्यांच्या हातात मोठं पातेलं होतं. सीननुसार त्यांना ट्रेन सुरु होताच जोरात पळायचं होतं आणि चालत्या ट्रेनमध्ये चढायचं होतं. कपिल दोन तीनदा ट्रोनमध्ये चढला मात्र नंतर त्याच्या लक्षात आलं की गर्दीचा सीन असल्याने तो गर्दीत दिसणार नाही त्यामुळे त्याने एक युक्ती लढवली.

Prabhatkhabar%2F2021 07%2F047d2cb7 88ce 4b86 b468 e9ba563e2b54%2Fkapil sharma.JPG?format=webp&w=750&dpr=1

कपिल शर्माला दिग्दर्शकाने खडसावलं : कपिलने या सीनच्या पुढच्या टेकला असं काही केलं की त्याला दिग्दर्शकाचा ओ’र’डा खावा लागला. दिग्दर्शकाने अॅक्शन म्हणताच ज्या दिशेने गर्दीसोबत पळायचं होतं त्या दिशेने न पळता कपिल विरुद्ध दिशेने पळू लागला. त्यानंतर दिग्दर्शकाने त्याला चांगलचं ख’ड’सा’व’लं.

सिनेमा रिलीज झाल्यानंतर कपिल मित्रांसोबत मोठ्या आनंदात सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. मात्र कपिलला तो ज्या सीनमध्ये होता तो सीनचं दिसला नाही. त्यामुळे सिनेमातून सीन कट केल्याचं त्याच्या लक्षात आलं. हा संपूर्ण किस्सा कपिलने सनी देओलसोबत त्याच्या शोमध्ये शेअर केला होता. हा किस्सा ऐकून सनीदेखील थक्क झाला होता.

See also  "मुंबईत राहून सुद्धा तुला मराठी येत नाही" अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला चांगलेच सुनावले...

n29674511474cde1e219380ad8c111117bdf8fa344a1bb9da8302e940ddaac1099493cad4e

आपण ही झाला आहात ना थक्क ? कारण किती निरागस आणि संघर्षमय प्रवासाचा किस्सा आहे. आजचा सुप्रसिद्ध कपिल काल एक स्ट्रगलर होता. त्याचं एकच म्हणणं असतं की काम मिळो न मिळो आपण आपलं प्रगल्भ होत रहायचं. तर कपिल ला त्याच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.स्टार मराठी कडून.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment