वयाच्या 15 व्या वर्षी एका मुलाच्या प्रेमात पडली होती करीना कपूर, तेव्हा तिच्या आईने दिली होती हि शि’क्षा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

करीना कपूर खान ही इंडस्ट्रीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री. करीनाने हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून आजवर जवळपास दोन दशके पूर्ण केली आहेत. तिने अनेकदा स्वत: सर्वोत्कृष्ट व परिपक्व अभिनेत्री असल्याचे सिद्ध केलेलं आहे. तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच हिट झालेले आहेत. काही तर सुपरहिट आहेत. करोडो रुपयांच्या क्लब मधील आहेत.

आज करीना तैमुर आणि जेह या दोन मुलांची आई आहे. त्यामुळे ती जबाबदारीच्या जगण्यात व्यस्त आहे. पण एक काळ असा होता जेव्हा करीना खूप लहान होती. बालपणात होती. अत्यंत खोडसाळपणा करणारी होती. करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांना त्यांची आई बबिता यांनी लहानपणी मोठ्या लाडाने वाढवले आहे. पण आई बबिता या दोन्ही पोरींच्या चुकांची शिक्षा सुद्धा त्यांना देत असे. अद्दल घडण्यासाठी.

See also  एक काळ प्रचंड गाजवणारी, दाऊत सोबत चर्चेत राहिलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री 19 वर्षांनंतर पुन्हा परतणार...

करीनाने एकदा अशी चूक केली होती की, आईने तिला डेहराडूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं होतं. ही कथा स्वत: करीनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती. आज करीना कपूर या अभिनेत्रीच्या ४१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बालपणीच्या प्रेमाच्या, खोडसाळपणाच्या व नंतर आईने दिलेल्या शिक्षेशी संबंधित असलेल्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ही गोष्ट आहे, करीना कपूर जेव्हा १५ वर्षांची होती तेव्हाची. नकळत्या वयात तिचं एका मुलावर खूप प्रेम होतं. तिला त्या मुलाबरोबर मनासारखा हवातेवढा वेळ घालवायचा होता. ती अनेकदा आईला हुलकावणी देत गुपचूप मुलाला भेटायला जायची. हे नंतर जेव्हा आई बबिता यांना माहित झालं तेव्हा मात्र जरा अवघडच झालं.

आईने फोन घेऊन तिला खोली मध्ये बंद केलं होतं. पण करीनाला मात्र आपल्या मित्रांसोबत त्या मुलालाही भेटायचं होतं. मग काय, एक दिवस आई बाहेर जाताच करीनाने चाकूने कसातरी दरवाजा उघडला आणि आपल्या मित्रांसह प्रेम करणाऱ्या त्या मुलाला भेटायला गेली.

See also  अनिल कपूर यांच्या "या" मूलीचे झाले अगदी गुपचूप 'लग्न', यामागील कारण ऐकून तुम्ही देखील हैरान व्हाल...

आई घरी आली. तिला घडलेला सगळा प्रकार कळला. आईची तळपायाची आग मस्तकाला गेली. अखेर करीनाच्या खोडसाळपणाला कंटाळून, लहान वयातच मुलाशी वाढत्या जवळीकीमुळे रागावून डेहराडून येथील बोर्डिंग स्कूलमध्ये तिला पाठविण्यात आले. करिश्मा कपूरने वयाच्या १४ व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. आणि त्याचसोबत मुलांबरोबर बाहेर जाण्याची परवानगीही तिला देण्यात आली होती; परंतु करीनाला असे काही करण्यास सक्त मनाई होती. हेच लहानपणी करीनाला अजिबात आवडलं नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment