अरेच्चा! “ममता बॅनर्जी करीनाच्या मुलाला कडेवर घेऊन काय करत आहेत…”, काय आहे नक्की हा प्रकार घ्या जाणून….
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील मोहतरमा अभिनेत्री करीना कपूर खान ही तर नेहमीच आपल्या नवनवीन गोष्टींमुळे प्रसिद्धीत झळकते. परंतु आता तर तिची दोन्ही मुलं म्हणजे तैमूर आणि जेह हे देखील तिच्या पावलावर पाऊल ठेवत फेमस होत आहेत. हल्लीच सोशल मीडियावर जहांगीरची भरपूर चर्चा होताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे ममता बॅनर्जी ह्या चक्क जेहला आपल्या कडेवर घेऊन दिसत आहेत. नक्की हा काय प्रकार आहे बुवा…चला तर मग आपण जाणून घेऊया.
सैफ अली खानचा नुकताच 51 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर करीना आणि सैफ हे दोघेही आपल्या मुलांसोबत मुंबईत परतले आहेत. त्या दरम्यानचा त्यांचा संपूर्ण कुटुंबाचा विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेयर केला आहे. वायरल झालेल्या या व्हिडिओ मध्ये जहांगीर त्याच्या आयासोबत दिसत आहे. ही तीच आया आहे, जी आधी तैमूरला सुद्धा सांभाळायची. परंतु या आयाला लोक व्हिडीओ पाहून त्या ममता बॅनर्जी आहेत, असे म्हणतात.
सोशल मीडियावरील युजर्स तर तो व्हिडीओ पाहून जहांगीरची आया ह्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत, असे म्हटले आहे. एक नेटकरी म्हणाला की,”ममता बॅनर्जी यांच्या हातात जेह आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला की,”ममता बॅनर्जी ह्या आया का बरं बनल्या आहेत.” तर तिसरा नेटकरी म्हणतो की,”जेहला पकडलेली आया ही हुबेहुब ममता बॅनर्जींसारखीच दिसते.”
तर आणखी एक नेटकरी म्हणाला की,”ममता बॅनर्जी ह्या जेहला कडेवर घेऊन काय करतात.” अशा अनेक कमेंट्स करत नेटकर्यांनी जेहच्या आयाची तुलना ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांसोबत केली आहे. छोट्याशा जेहचा हा व्हिडीओ मालदीव वरून परतल्यानंतरचा आहे.
अभिनेत्री करीना कपूरचा धाकटा मुलगा जेह याचा जन्म फेब्रुवारीत झाला होता. परंतु अजूनपर्यंत करिनाने त्याचा चेहरा कधीच दाखवला नव्हता. उलट ती नेहमी त्याच्या चेहऱ्यावर स्टिकर लावून दाखवायची. परंतु मालदीव मधील फोटोज् मध्ये जेहचा चेहरा दिसला. तसेच करीना कपूर खान हिने आपल्या प्रेग्नंसी बायबल या ग्रंथात तैमूर हा सैफसारखा दिसतो. तर जेह हा माझ्यासारखा दिसतो., असे सांगितले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.