या कारणामुळे झाले होते करिना-शाहिद कपूरचे, 13 वर्षांनंतर करिनानं केला धक्कादायक खुलासा

 

अभिनेत्री करिना कपूर आणि शाहिद कपूर हे एकेकाळचं बॉलिवूडचं बहुचर्चित कपल राहिले आहेत. बरीच वर्षं हे दोघंही एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी एकत्र अनेक सिनेमा सुद्धा केले. या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यवर घेतलं होतं पण अशातच दोघांनी ब्रेकअप केलं. त्यानंतर करिनानं सैफ अली खानशी लग्न केलं आणि शाहिद कपूर मीरा राजपूतशी लग्नाच्या बेडीत अडकला. पण आता शाहिद कपूरशी ब्रेकअपबद्दल 13 वर्षांनंतर करिनानं धक्कादायक खुलासा केला.

इम्तियाज अलीच्या ‘जब वी मेट’ या सिनेमात करिना व शाहिदने एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या सेटवरून दोघांत ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पुढे या बातम्या ख-या ठरल्या. पण हे ब्रेकअप का झाले? हे अद्याप कुणालाही ठाऊक नव्हते. पण नुकत्याच अनुपमा चोप्राला दिलेल्या एका मुलाखतीत करिनाने या ब्रेकअपच्या कारणांचा खुलासा केला.

शाहिद कपूरशी ब्रेकअपबद्दल बोलताना करिना म्हणाली, ‘तुमच्या नशिबाचे स्वतःचे काही वेगळे प्लान असतात आणि तुमचं आयुष्य त्यानुसार चालतं. ‘जब वी मेट’चं शूटिंग आणि ‘टशन’ सिनेमा या दरम्यान काही गोष्टी अशाप्रकारे घडल्या की माझं आयुष्य त्यामुळे बदलून गेलं आणि माझे आणि शाहिदचे रस्ते बदलले.’

त्यावेळी माझ्या आणि ‘गीत’च्या (‘जब वी मेट’मध्ये गीत नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.) आयुष्यात घडत असलेल्या अनेक गोष्टी सारख्या होत्या. त्यावेळी खासगी आणि प्रोफेशनल लाइफ दोन्ही सांभाळणे कठीण झाले होते. ‘जब वी मेट’च्या सेकंड हाफमध्ये ज्याप्रमाणे गीतचे आयुष्य बदलते त्याप्रमाणे माझेही आयुष्य बदलले.

ती पुढे म्हणाली,‘जब वी मेट’ आणि ‘टशन’ हे माझ्या आयुष्यातील सर्वात खास सिनेमे आहे. ‘जब वी मेट’ने माझे आयुष्य बदलले तर ‘टशन’ सिनेमाच्या सेटवर मला सैफ भेटला.

करिना कपूर ‘जब वी मेट’ आणि ‘टशन’ हे दोन्ही सिनेमा तिच्या आयुष्यातील सर्वात खास सिनेमा असल्याचं सांगते. ‘जब वी मेट’नं तिचं आयुष्य बदलून टाकलं तर दुसरीकडे ‘टशन’ सिनेमाच्या सेटवर तिच्या आयुष्यात सैफ आला आणि अखेर तो तिचा लाइफ पार्टनर सुद्धा झाला. 2007 मध्ये ‘जब वी मेट’ रिलीज झाला होता.

पण या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान करिना आणि शाहिद यांच्यातील नातं बिघडत गेलं होतं. या सिनेमानंतर करिनानं ‘टशन’ सिनेमात काम केलं ज्यात सैफ आणि अक्षय कुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. यावेळी सैफ-करिनानं एकमेकांना डेट करायला सुरूवात केली आणि 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. तर 2015 मध्ये शाहिदनं मीरा राजपूतशी लग्न केलं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment