अभिनेत्री करीना कपूरने लिहिलंय ‘प्रेग्नेंसी बायबल’ नावाच पुस्तक, पुस्तकामध्ये लिहिलंय अस काही कि…

बॉलीवूडची बहुचर्चित अभिनेत्री, नेहमीच आपल्या फॅशन व फोटोशू’ट’स मुळे प्रकाशझोतात राहणाऱ्या करीना कपूरने आपल्या दुसऱ्या ग’रो’द’र’प’णा’च्या काळात प्रेगन्सीच्या टिप्स देणारं पुस्तक लिहिलं असून ते लौकरच प्रकाशित होणार आहे.

‘करिना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ असं या पुस्तकाचं शीर्षक असून आगामी काळात लवकरच ते प्रकाशित होणार आहे. सुप्रसिद्ध जगरनॉट बुक्स ही प्रकाशन संस्था हे पुस्तक सर्वत्र प्रकाशित करणार आहे.

मित्रांनो! जसे की आपण सर्वजण जाणतो, करिना कपूर ही बॉलिवूडमधील फक्त एक व्यक्तीच नाही तर ती स्वतःच एक ब्रॅण्ड आहे. कपूर खानदानात जन्म झालाय आणि राजेशाही अशा पतौडी घराण्यातील नबाब सैफ अली खान या अभिनेत्याशी लग्न एवढीच तिची ओळख नाही.

तिची स्वतःची चित्रपट कारकीर्द लक्षणीय आहेच पण त्याचबरोबर करिना कपूर स्वत फॅशन आयकॉन आहे. आपल्याकडे अं’ग’भू’त असलेल्या प्रत्येक गोष्टीचं चांगल्या अर्थाने मार्केटिंग कसे करावे याची तिला चांगलीच समज आहे. आणि ते ती करतेही. यामुळेच ती कायम चर्चेतही असते.

इतर अभिनेते, अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी छायाचित्रकारांपासून अंतर, गो’प’नी’य’ता ठेवतात, तर काही च’क्क पळ काढतात. असे असताना करिना मात्र प्रत्येक ठिकाणी छायाचित्रकारांना न टा’ळ’ता सहज दिलखुलासपणे सामोरी जाते.  ‘या आणि माझी कितीही छायाचित्रं घ्या. मला आवडतं कुणीतरी माझी छायाचित्रं काढणं’ असं तिचं म्हणणं असतं.

करिनाचा पहिला मुलगा तैमूर हा तर जन्मल्यापासूनच एका सेलिब्रिटीचे आयुष्य एन्जॉय करतोय. तो सुद्धा आईप्रमाणेच नेहमी  ‘टॉक ऑफ द टाऊन’ असतो. इतर बॉलीवूड सेलेब्रिटी आपल्या मुलांना माध्यमांपासून दूर ठेवण्याचा, द’ड’व’ण्या’चा प्रयत्न करत असतात.

करिनाने मात्र तैमूरची छायाचित्र घेण्यास छायाचित्रकारांना कधीही म’ज्जा’व केला नाही. एरवी इतर अभिनेत्री आपली प्रेमप्रकरणं, लग्न, गरोदरपण हे सगळेच टप्पे शक्यतो लपवण्याचा प्रयत्न करत असतात हे आपण पाहतो परंतु करिनाने आपल्या आयुष्यातला अशा गोष्टी कधीच लपवल्या नाहीत.

तैमूरच्यावेळीचं आणि आता दुसरं गरोदरपणही ती छान मि’र’व’ता’ना दिसते. आपली प्रेग्नन्सी लपवण्याऐवजी उ’ल’ट तिने प्रेगा न्यूजची जाहिरात केली होती हे तुम्हाला आठवत असेलच.

ग’रो’द’र’प’णा’च्या काळात, पुढे आलेलं पोट हे बे’ढ’ब दिसण्याची शक्यता लक्षात घेऊन घरातच थांबण्याऐवजी उ’ल’ट अशा काळात घालता येतील असे सुंदर फॅशनेबल कपडे घालून तिने तसा ट्रेण्डच से’ट केला.

आणि असेच नवनवीन ट्रें’ड्स’ से’ट करत असल्याने करिना फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे. ती सतत नवीन काहीतरी करत असते.  तिने फॅशनच्या टिप्स देणारं एक पुस्तक लिहिलं आहे. तिने टीव्ही चॅनल्ससाठी मुलाखती घेण्याचा कार्यक्रम केला आहे. करिनाच्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील.

आता हेच उदाहरण पहा ना, नुकत्याच झालेल्या तैमूरच्या चौथ्या वाढदिवशी तिने तिच्या दुसऱ्या, प्रेग्नन्सी टिप्स देणाऱ्या पुस्तकाची घोषणा केली आहे. करिनाच्या या पुस्तकात गरोदरपणाची सगळी वैद्यकीय माहिती तर असेलच,

पण त्याबरोबरच ग’रो’द’र’प’णा’च्या काळातला आहार, फि’ट’ने’स, डि’लि’व्ह’री नंतर बाळाची काळजी कशी घ्यायची याबाबत देखील करिनाच्या खास टिप्स असतील. करिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या पुस्तकाचं मुखपृष्ठदेखील शेअर केलं आहे. “करिना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल” त्याची लिंक खालीलप्रमाणे :-https://www.instagram.com/p/CJA1HjaJQY6/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
करीना आता लेखिका म्हणून नवीन क्षेत्रात पदार्पण करतेय. तिच्या या नवीन पुस्तकाला टीम स्टार मराठी आणि रसिकांकडून हार्दिक शुभकामना!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment