करिनाने पहिल्यांदाच शेअर केलाय तैमुरसोबत दुसऱ्या मुलाचाही फोटो. “जेह” हे त्याचे खरे नांव नसून, ते आहे…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो!, बॉलीवूड सिनेसृष्टीचे आणि विशेषतः बेबो करिनाने चाहते ज्या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते तो क्षण अखेर आता आला आहे. नुकतेच करीना कपूरने तिचे दोन्ही मुले तैमूर आणि जेहसोबत एकत्र फोटो शेअर केले आहेत. या लहान खोडकर मुलाच्या निरागसपणावर तमाम चाहते प्रचंड खुश झालेले दिसत आहेत. हे फोटो शेअर करण्याबरोबरच करीनाने एक अतिशय गोड गोंडस कॅप्शनही लिहिली आहे जिच्यामध्ये तीने तिच्या दोन्ही मुलांना तिची शक्ती, तीचा अभिमान आणि तीचे संपूर्ण जग म्हंटलेले आहे.

kareena kapoor

जो हातात पुस्तक घेऊन खेळताना दिसत आहे तो तैमुर आहे. तर इमोजीवाला जेह आहे. तैमूर आणि जेह दोघेही करीनाचे जग आहेत ज्यांच्यासोबत ती खूप वेळ घालवते. जरी करीनाने प्रसूतीनंतर लवकरच काम सुरू केले आहे, परंतु असे असूनही, ती या दोघांसोबत अधिकाधिक वेळ घालवते आणि त्यांचे निरागसपणा कॅमेऱ्यात कैद करून चाहत्यांसह त्यांचे निरागसपणा शेअर करत राहते. करीनाने अद्याप जेहचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही आणि चाहते त्याला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Kareena Kapoor Khan second child name Taimur Ali Khan Pataudi with Jeh Ali Khan

करिनाने आपल्या दुसऱ्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. आतापर्यंत करिना तिच्या छोट्या मुलाला जेह म्हणून हाक मारत आली आहे. परंतु, करिनाच्या छोट्या मुलाचं नाव जेह नाही. या गोष्टीचा उल्लेख करिनाने तिच्या प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकात केला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, करीनाने संपूर्ण पुस्तकात तिच्या छोट्या मुलाला जेह या नावाने हाक मारली आहे. परंतु, तिच्या मुलाचं खरं नाव जेह नसून जहांगीर आहे.

karina

पुस्तकाच्या शेवटच्या काही पानांत या गोष्टीचा उल्लेख आहे. इतकंच नाही तर करिनाने पुस्तकाच्या शेवटी आपल्या दोन्ही मुलांचे फोटो शेअर केले आहेत आणि लिहिलं, ‘तुमच्याशिवाय माझं पुस्तक अपूर्ण आहे. तुम्ही माझी ताकद आहात, माझं जग माझा अभिमान आहात. यापूर्वी तैमूरच्या नावावरून सोशल मीडियावर बराच वाद उफाळून आला होता. त्यामुळे करिना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नावाचा खुलासा केला नाही.

taimoor

करिनाने फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर तीन महिन्यातच करिना कामावर परतली होती. त्यावरून अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं तर काहींनी करिनाला एवढ्या छोट्या मुलाला घरी ठेवून आल्याबद्दल ट्रोल केलं होतं. करिना लवकरच आमिर खान सोबत ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात झळकणार आहे.

See also  तैमूर पेक्षाही खूपच सुंदर आणि क्युट आहे राणी मुखर्जीची मुलगी, तिचे फोटो पाहून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment