करीना कपूरचा मुलगा ‘जेह’ ऍक्टिंग नाही तर या क्षेत्रात कमावणार नाव, या व्यक्तीने केली भविष्यवाणी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीची क्वीन अभिनेत्री करीना कपूर आणि नवाब अभिनेता सैफ अली खान हे दोघेही आपल्या ढिंकचाक लवस्टोरीमुळे नेहमीच प्रसिद्धीत असतात. परंतु आता त्यांची ही दोन लहानशी बाळं देखील आपल्या मम्मी- पप्पांच्या पावलावर पाऊल ठेवत फेमस होत आहेत. तैमूर बद्धल तर आपण सर्वांनी बरेच ऐकले आहे, परंतु आता सैफिनाचा लहान मुलगा ‘जे’ह’ हा पण चर्चेत आला आहे.

21 फेब्रुवारी 2021 रोजी करीनाने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्याचे काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात वायरल होत आहेत. त्याचबरोबर जेह भविष्यात काय होणार, याबाबत देखील सांगितले जात आहे. तर मित्रांनो काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करीना कपूर हिने आपल्या दुसऱ्या बाळाचे नाव जेह असे ठेवले. त्यानंतर ताबडतोब त्याच्या विषयीच्या भविष्यवार्ता समोर येऊ लागल्या आहेत.

See also  अभिनेता धर्मेंद्र यांच्या कुटुंबावर आहे करोडोंचे कर्ज, एकट्या सनी देओलवर आहे एवढ्या कोटींचे कर्ज...

kar

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या जेह चे नशीब खूपच उज्ज्वल आहे, हे काही नव्याने कुणाला सांगण्याची गरज मुळीच नाही. अहो, पण इतकंच नव्हे तर जेह हा आपल्या मॉर्ङन मम्मी- पप्पांसारखाच फेमस स्टार तर बनेलच, परंतु त्याचसोबत तो आणखी एका क्षेत्रात नाव कमावणार असल्याचं भाकित न्यूमरॉलॉजिस्ट अंजली पी जैन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

मीडिया रिपोर्टस् नुसार अंजली पी जैन यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की,”करीना- सैफ यांचा धाकटा मुलगा जेह हा अभिनय क्षेत्रासोबतच राजकारणात देखील आपली छाप उमटवेल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. जेह हा अनेक महान कामे करण्यासाठी जन्माला आला आहे.

saif kareena.jpeg?Y7KseOK9cKjgQCh0u

त्याच्या मध्ये नेतृत्त्वगुण भरपूर असतील. त्यामुळे त्याच्यासोबत राहणारा प्रत्येकजण हा त्याच्या नेतृत्त्वगुणांनी अक्षरशः भारावून जाईल. राजकारणात तो आपलं पाऊल ठेवेल व त्या क्षेत्रात त्याला प्रचंड यश मिळेल.

See also  दुसरे लग्न करण्यासाठी आपल्या पत्नी सायरा बानोला दिलीपकुमार यांनी सोडले होते, त्यानंतर जे झाले ते...

त्याचसोबत तो अभिनय क्षेत्रात देखील आपली जबरदस्त छाप उमटवेल. तसेच जेह हा एक सुसंस्कारी मुलगा असेल व त्याचा फॅशन सेन्स सुद्धा भन्नाट असेल. संपूर्ण जग पाहण्याची महत्त्वाकांक्षा असलेला जेह प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या सुप्त गुणांनी लोकांना स्वतःकडे आकर्षित करेल”, असे अंजली पी जैन यांनी सांगितले आहे.

saif ali khan baby 1200

तर मित्रांनो आता बेबोचा हा धाकटा मुलगा तिच्यासारखाच फुल टू जबरदस्त निघणार की आपल्या आईपेक्षा दोन पावलं अधिक हुशार निघणार हे तर भविष्यातच आपल्याला समजेल. परंतु करीना- सैफ ची ही दोन्ही बाळं त्यांच्या सारखीच अतिशय तल्लख बुद्धीची व मेहनती होणार, हे तर नक्कीच आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment