करिना कपूरने दाखवला तैमूरचा नवा जबरदस्त लुक खूपच हटके व गोड दिसत आहे हा छोटा नवाब…
कोरोना काळात सध्या बहुतांश सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात एक्टिव दिसतात. याच दरम्यान आता बॉलीवुडची मल्लिका अभिनेत्री करीना कपूर हिचा लाडका मुलगा तैमूर अली खान याचा नवीन लुक आपल्या समोर आला आहे. या नवीन लुक मध्ये तैमूर हा खूपच क्यूट दिसत आहे. कारण यामध्ये तैमूरची नवीन हेअरस्टाईल आपण पाहू शकतो.
हो, पण यावेळी तैमूरने आपल्या तोंडावर मास्क लावला होता. आपल्या नव्या हेयरकटसह तैमूर बांद्रा मध्ये स्पॉट होताना दिसला. त्यामुळे त्याची झलक पाहताच सर्व फोटोग्राफर्स त्याच्याकडे धावताना दिसले. फोटोग्राफर्सना पाहताच तैमूर ताबडतोब छान पोज देऊ लागला. तैमूर मोठा भाऊ बनताच खूप जबाबदार बनला.
काही दिवसांपूर्वीच करिनाने तैमूरचा एक फोटो शेयर केला होता, ज्यामध्ये तो सर्वांसाठी काही तरी स्पेशल बनवताना दिसत होता. तैमूर च्या या फोटोला चाहत्यांना खूप छान प्रतिसाद मिळाला. करीनाने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, तैमूरला ती खूप साधारण कपडे घालते. तिने म्हटले की, मी तैमूरसाठी एदिदास, जारा आणि एचएनएम वरून शॉपिंग करते. त्याच्यासाठी मी गुच्ची आणि पराङा यांसारखे बँङ वापरत नाही.
तुम्हांला ठाऊक आहे का, तैमूरला लाइमलाइट पासून दूर ठेवण्यासाठी सैफ अली खानने त्याला बोर्डिंग स्कूल ला पाठवण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे. पण करीना म्हणते की, मी असे होऊ देणार नाही. आपल्या एका मुलाखतीमध्ये तैमूरच्या आजी शर्मिला टागोर यांनी म्हटले की, तैमूर तर माझ्यापेक्षाही जास्त आताच फेमस आहे. एवढंच नव्हे तर त्याची पॉप्युलिरिटी ही दिवसेंदिवस आणखी वाढत चालली आहे.
अभिनेता सैफ अली खान हा आपल्या मुलाला खूप मोठा स्टार अभिनेता झालेला पाहू इच्छित आहे. सैफ म्हणतो की, कोणत्या तरी एका दिवशी तैमूर आपला स्वतःचा पहिला चित्रपट रिलीज करेल, हा माझा विश्वास आहे. तैमूरने एक अभिनेता बनावे, अशी माझी इच्छा आहे.
तैमूर प्ले स्कूल मध्ये जात आहे. किङ जिम स्कूलची तीन महिन्यांची फीस 15000 रु. आहे. म्हणजेच प्रत्येक महिना 5000 रु. अशाप्रकारे आहे. विशेष म्हणजे लहान मुलांच्या या शाळेत आठवड्यातून फक्त एक दिवसांचा क्लास असतो. येथे मुलांना खेळण्यासाठी व शिकण्यासाठी खूप खूप इक्युमेंट्स आहेत. पण सध्या तरी शाळा बंद आहे.
एकदा तर अभिनेत्री करीना कपूर हिने तैमूर संबंधी अक्षयकुमारला सुद्धा चॅलेंज केले होते. करीनाने एका मुलाखतीमध्ये अक्षयला म्हटले होते की, तैमूर येणाऱ्या पुढील दिवसांत तुमच्यासाठी खूप मोठा खतरनाक ठरू शकतो. एवढंच नव्हे तर तो तुमचे फॅन्स सुद्धा चोरू शकतो. तसेच करीना म्हणाली की, जर तुम्ही तैमूर सोबत तुमचा चित्रपट रिलीज कराल, तर तुमचा नव्हे तर तैमूरचा चित्रपट सर्वांत जास्त हिट ठरेल. हे एक ओपन चॅलेंज आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.