अभिनेत्री करीनाच्या लहान बाळाला आहेत घनदाट केस, आपल्या या लाडक्याची करीना घेते खूपच काळजी…

मॉडर्न स्टायलिश अभिनेत्री करिना कपूर हिने हल्लीच आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे तिचे जगभरातील सर्व चाहते हार्दिक शुभेच्छा देऊन आपला आनंद व्यक्त करत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बेबो ने आपल्या छोट्याशा क्यूट बाळाची एक झलक सोशल मीडियावर शेयर केली होती. तिने आपल्या छोट्या नवाब सोबत एक सेल्फी इन्स्टाग्रामवर वायरल केला होता.

kareena kapoor jpg

या फोटोसोबत तिने एक कॅप्शन लिहिले होते की, “अशी कोणतीही गोष्ट नाही, जी एक महिला करू शकत नाही. हॅप्पी वुमन्स ङे माझ्या सर्व लाडक्या मित्र- मैत्रीणींना.” याच सोबत तिने हॅशटॅग वुमन्स ङे असे देखील लिहिले होते. अभिनेत्री करीना कपूरने शेयर केलेला हा फोटो काही वेळातच वायरल झाला.

See also  'देवा हो देवा गणपती देवा' सुपरहिट गाण्याचे निर्माते संगीतकार 'राम-लक्ष्मण' यांचं नि'धन...

यावर तिच्या फॅन्स सोबत इतर सेलिब्रिटीजने देखील लाईक केले. करीना ची नणंद सबा अली खान हिने त्या फोटोवर “तू एक शानदार महिला आहेस. लव यू.” अशी कमेंट केली आहे.

kareena kapoor 2 jpg

हो पण, या फोटोमध्ये करिनाने या फोटोमध्ये आपल्या बाळाचे तोंड दाखवले नव्हते. तिने शेयर केलेल्या या ब्लॅक आणि व्हाईट फोटोमध्ये आपल्या बाळाला करीनाने खांद्यावर पकडले आहे, असे दिसते. बिलकुल मेकअप न केलेली करीना मोकळ्या केसांमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

करीनाचा हा छोटा मुलगा आपल्या आईच्या खांद्यावर आरामात झोपलेला दिसत आहे. तर त्याचे केस खूप घनदाट आहे. आपल्या लाडक्या बाळाला तिने एका चादरीत लपेटून ठेवलेले दिसते. 21 फेब्रुवारीच्या दिवशी तिने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. तर तिच्या दुसऱ्या बाळाचे नाव काय बरं असणार, याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पण सैफ व करीना यांनी अजूनपर्यंत कोणत्या गोष्टीचा खुलासा केला नाही.

See also  झेंडा चित्रपटानंतर अवधूत गुप्तेंना व्हावं लागलं भूमिगत; बाळासाहेब ठाकरेंनी दाखवली होती ‘ती’ तयारी...

kareena kapoor 5 jpg

आपल्या बाळाला जन्म दिल्यापासून अजूनपर्यंत करीना घरातून बाहेर पडलेली नाही. तर तिचे फ्रेंड्स मलाइका अरोरा, अमृता अरोरा, नताशा पूनावाला, अर्जुन कपूर आणि तिची बहीण करिश्मा कपूर हे सर्वजण भेटायला आले होते. तर ती सध्या आपली लाईफ एन्जॉय करत आहे.

अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या प्रोफेशनल लाइफ बद्दल म्हणायचे झाले, तर बेबो लवकरच लाल सिंह चङ्ङा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आमीर खान दिसून येतील. तर सैफ अली खान हा भूत पूलीस मध्ये अर्जुन कपूर, यामी गौतमी आणि जैकलीन फर्नांडिस यांसह दिसेल.

kareena kapoor 6 jpg

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close