या ‘एका घटनेनंतर’ कर्मवीर भाऊराव पाटलांनी आयुष्यात परत कधीच पायात चप्पल घातली नाही, कारण…

कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील यांची आज जयंती. मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक म्हणून समाजप्रिय अण्णांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी रयत शिक्षण संस्था स्थापन करुन हिमालया एवढे काम करून ठेवलेय हे आपण जाणतोच. आज अण्णांच्या जयंती निमित्ताने एक अशी घटना आम्ही आमच्या वाचकांना सांगू इच्छितो की ती वाचून तुम्हाला अण्णांबद्दल वाटणारा आदर आणखीनच वाढेल.

अण्णांच्या लहानपणी एका भिल्लाने त्यांना जीवापाड सांभाळलं होते. त्यांना अंगाखांद्यावर खेळवलं होते. लहानग्या भाऊरावच्या पायाला विं’चू’का’टा टो’चू नये म्हणून तो भिल्ल त्यांना खांद्यावर घेऊनच फिरायचा. दिवसामागून दिवस निघून गेले. लहानगा भाऊ आता मोठे झाला होता. भाऊचा भाऊराव होऊन त्याने समाजकार्यात स्वतःला झोकून दिले होते. बालपणी भाऊंना सांभाळणारा तो भिल्ल क्रांतिकारक होता, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता, शेवटी एके दिवशी त्याला इंग्रजांनी कै’द केले.

त्याच्यावर ख’ट’ला भरला. क्रांतिकारी म्हणून सरकार वि’रो’धी घोषित करून फा’शी’ची शि’क्षा सुनावली गेली. फा’शी’च्या आदल्या दिवशी कर्मवीर आण्णा तु’रुं’गात त्याला भेटायला गेले. भिल्लांने अण्णांना पाहिले. तो ओळखीचे हसला. म्हणाला भाऊराया! अरे, कसा आहेस तू? उद्या हे इंग्रज मला फा’सा’वर लटकवणार आहेत. , कर्मवीर अण्णांचे डोळे भ’रु’न आले.

ते पाहून तो भिल्ल अण्णांचे सां’त्व’न करत म्हणाला, “अरे भाऊराया, दु:ख मानायचं नाही, मी चांगलं काम केलंय. आणि मरायचं तर मला एक ना एक दिवस होतंच.” आण्णा म्हणाले, “दादा, मी आत्ता या घडीला तुझ्यासाठी काय करु? मी आजवर तुला काहीच दिलं नाही रे.” ते ऐकून तो भिल्ल म्हणाला, ” भाऊराया, मी फा’सा’वर जातांना तुझ्या प्रेमाचा आधार वाटावा म्हणून मला एक वस्तू देशील?… तुझ्या पायात जी नवीकोरी कोल्हापुरी चप्पल आहे ना, ती मला दे.

तत्क्षणी कर्मवीरांनी तु’रुं’गा’च्या गजाच्या फटीतून आपली नवीकोरी कोल्हापुरी चप्पल आत सरकवली, त्या भिल्लांने ती पायात घातली अन हसून म्हणाला, भाऊराया! अरे आता असा तुझ्या प्रेमाचा आधार असला तर फाशीच्या वे’द’नांचा त्रा’सच जाणवणार नाही. दुसऱ्या दिवशी तो भिल्ल अण्णांची नवीकोरी कोल्हापुरी चप्पल पायात घालूनच स्वातंत्र्यासाठी फा’सा’वर गेला.

त्यानंतर पुढे आयुष्यात कर्मवीर भाऊराव पाटलांनी आयुष्यभर कधीच चप्पल वापरली नाही. लोक विचारायचे आण्णा, चप्पल कुठंय?

भाऊराव पाटील म्हणायचे, “माझ्या दादाला दिली.”

अण्णांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment