येदियुरप्पा यांनी चार वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, परंतु एकदाही कार्यकाळ पूर्ण शकले नाहीत, जाणून घ्या खास गोष्टी
बेंगलोर: आज 26 जुलै रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच राजीनामा दिला असला तरी ते राज्यातील राजकरणात सक्रिय राहणार आहेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांची राजकीय कारकीर्द आणखी लांब चालणार असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या जागी कोणीही आले तरी, ते पक्षाला पुढे नेण्यास मदत करत राहतील. तथापि, चार वेळा मुख्यमंत्री झालेले येदियुरप्पा यांच्यासाठी सर्वात खेदजनक बाब म्हणजे ते कधीही आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत.
कर्नाटकमध्ये भाजप पक्ष उभारणीत 78 वर्षीय येदियुरप्पा यांचा मोठा वाटा आहे. दोन दशकांपेक्षा जास्त मेहनतीनंतर त्यांनी कर्नाटकच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली आह. कदाचित याच कारणास्तव लिंगायत नेत्याच्या रूपात दक्षिण भारतात कोणत्याही पक्षाकडे त्यांच्यापेक्षा मोठा चेहरा नाही.
सरकारी लिपिक ते हार्डवेअर स्टोअर मालक आणि चार वेळा मुख्यमंत्री होण्यापर्यंत येदियुरप्पा यांनी राजकारणात कठीण प्रवास केला आहे. दोन वर्षापासून कायदेशीर लढाई आणि अनेक आठवड्यापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे त्यांना कार्यकाळ पूर्ण होण्याच्या 2 वर्ष अगोदरच राजीनामा द्यावा लागला आहे.
येदियुरप्पा यांच्या राजीनाम्याची कारणे पाहिल्यास प्रथमदर्शी असे दिसते की वयामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. कारण भाजपामध्ये असा अलिखित नियम आहे की 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना निवडणुकीच्या राजकारणापासून वगळण्यात येते. बी.एस. येदियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर येणार्या नव्या चेहर्याला 2023 मध्ये होणार्या निवडणुकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो.
2007 मध्ये पहिल्यांदा बनले होते मुख्यमंत्री
येदियुरप्पा पहिल्यांदा 2007 मध्ये मुख्यमंत्री झाले होते. मात्र ते फक्त 7 दिवसासाठीच मुख्यमंत्री होते. 2008 मध्ये ते दोन महिन्यासाठी मुख्यमंत्री होते. 2018 मध्ये तर फक्त 3 दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. मात्र, त्यानंतर त्यांचा चौथा कार्यकाळ 26 जुलै 2019 पासून 2 वर्षाचा राहिला.
कर्नाटक मधील भाजपचा प्रमुख चेहरा
कर्नाटकातील भाजपाच्या विकासाचे श्रेय त्यांनाच दिले जाते. ते पक्षाच्या राज्य युनिटचे अध्यक्ष होते, विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले, विधानपरिषदेचे सदस्य बनले आणि त्यानंतर ते संसदेवर निवडून गेले. कला शाखेत पदवी संपादन करणारे येदियुरप्पा आणीबाणीच्या काळात तुरूंगात गेले होते. तसेच ते समाज कल्याण विकास विभागात लिपीक म्हणून काम करत होते.