वॉशिंग पावडर “निरमा”! जाणून घ्या एका बापाने आपल्या मृ’त मूलीला कसे अजरामर केले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपली मुलं म्हणजे आईवडिलांचा जणूकाही जीव की प्राण असतात. त्यांच्या सुखासाठी, आनंदासाठी किंवा त्यांच्या सानिध्यात राहण्यासाठी आईवडिल स्वतःच्या जीवाचा अगदी आटापिटा करतात. अशाच एका लडिवाळ बापाची काळजावर हात घालणारी कहाणी आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. जी तुम्हांला सर्वांना नक्कीच आवडेल.

“निमा, रेखा, जया और सुषमा…सबकी पसंद निरमा” या ओळी ऐकून तुम्हांला आठवलंच असेल की….ती जाहिरात हो….जी सर्वांना खूप आवडायची. आपल्या भारतातील बहुतांश लोकांची ही “निरमा” वॉशिंग पावडर फेवरेट बनली होती. अहो, परंतु हे “निरमा” हे नाव नक्की कुठून बरं आले असावे, हा प्रश्न तर तुम्हांला देखील कधीतरी पडलाच असेल. चला तर मग पाहूया या नावामागील इतिहास…

निरमा कंपनीचे मालक करसनभाई पटेल यांचे मूळ गाव गुजरात मधील मेहसाणा हे होते. त्यांचे वडील खोङीदास पटेल हे एक अंत्यत साधारण व्यक्तीमत्व होते. पण तरीही त्यांनी खूप मेहनतीने आपल्या मुलाला रसायनशास्त्रात पदवीधर बनवले. इतर सर्व लोकांप्रमाणेच करसनभाई यांना सुद्धा स्वतःचा एक उत्कृष्ट बिजनेस करायचा होता. परंतु आपल्या घरची परिस्थिती ह’लाखीची असल्याने त्यांनी एका लॅबमध्ये असिस्टंट म्हणून नोकरी करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांना पुढे एका सरकारी खात्यात नोकरी लागली.

See also  औरंगजेबाचे वंशज जगत आहेत सध्या असे जीवन, पहा लोकांनी असे केले त्यांचे हाल...

परंतु त्यादरम्यान त्यांच्यावर काळाने आ’घा’त केला. करसनभाई यांची लाडकी लेक “निरूपमा” हिचे अकाली नि’ध’न झाले. निरूपमाला लोक लाडाने “निरमा” अशी हाक मारत. आपली मूलगी मोठी होऊन आपले स्वप्न पूर्ण करेल, असे त्यांना वाटत होते. परंतु तिच्या अचानक जाण्याने हे त्यांच्या काळजाला लागले.

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी 1969 मध्ये “निरमा” कंपनीची स्थापना केली. या कंपनीची स्थापना करून त्यांनी आपल्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल केली. त्यानंतर त्यांनी स्वतःचे स्वप्न तर पूर्ण केलेच. पण त्याचबरोबर त्यांनी आपल्या लाडक्या मूलीचे नाव सुद्धा अजरामर केले.

सुरुवातीला त्यांनी घरगुती स्तरावर निरमा या वॉशिंग पावडरचे उत्पादन करायला सुरुवात केली. तेव्हाच्या काळात जाहिराती नव्हत्या. म्हणून करसनभाई सायकलवरून सर्वांच्या घरी जाऊन आपल्या उत्पादनाची विक्री करायचे. त्यादरम्यान मार्केटमध्ये हिंदुस्थान लिव्हरची सर्फ कपडे धुण्यासाठी उपलब्ध असायची. परंतु तिची किंमत 13 रु. होती. जी सामान्य माणसाला मुळीच परवङणारी नव्हती.

See also  50 वर्षीय सासूचे 25 वर्षीय आपल्याच जावयासोबत लफडं, पळून जाऊन केले त्याच्याशी लग्न...

त्या तुलनेने निरमा वॉशिंग पावडर ही फक्त 3.50 रु. प्रतिकिलो होती. जी सामान्य माणसाच्या खिशाला सहजपणे परवडणारी होती व त्यामुळे हाताला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसे. म्हणून लवकरच या पावडरची मागणी वाढू लागली. कालांतराने नोकरी आणि व्यवसाय सांभाळणे, हे करसनभाईंना जमवणे कठीण होऊ लागले. या कारणामुळे त्यांनी नोकरीला कायमचा रामराम ठोकला व आपले संपूर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रित केले.

जाहिरातीसाठी त्या काळात रेडिओ आणि वर्तमानपत्र मर्यादित होते. तरीही करसनभाईंनी खटाटोप करून टिव्हीवर सुद्धा आपल्या वॉशिंग पावडरची जाहिरात दिली. त्यामुळे “निरमा, वॉशिंग पावडर निरमा…सबकी पसंद निरमा” या शब्दांनी ही जाहिरात सर्वत्र गुंजू लागली व पाहता पाहता ही “निरमा” वॉशिंग पावडर सर्वांची फेवरेट बनली.

See also  भररस्त्यात कॅब ड्रायव्हरला तब्बल 22 वेळा कानाखाली मा'रणारी ही तरुणी नेमकी आहे तरी कोण बरं?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment