प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडचा झाला साखरपुडा, साखरपुड्याचे हे फोटो तुम्ही पहिले का…
.
‘सा रे ग म लिटील चॅम्प’ मधुन आपल्या मधुर आवाजामुळे प्रसिद्ध झालेली सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड हिचा सारखपुडा संपन्न झाला. कार्तिकी गायकवाडने तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
को-रो-ना वि-षा-णू-मुळे लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून अगदी कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थिती हा समारंभ पार पडला. कार्तिकीचा होणारा पती रोनीत पीसे हा पुण्यामध्ये राहतो व तो एक मॅकेनिकल इंजिनियर आहे. तसेच त्याचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे.
लग्न ! म्हणजे दोन जीवांच्या मिलनाची गाठ. आयुष्याचं एका संसारातुन दुसऱ्या संसारात होणारं रूपांतर. अनोळखी व्यक्तीला ओळखीचा करून आपल्या आयुष्यात त्याला सर्वाच्च स्थान देणं. लग्नाच्या अश्या कितीतरी व्याख्या करता येतील.
देवा ब्राम्हणाच्या साक्षीने योग्य मुहूर्तावर आज कितीतरी माणसं लग्न बंधनात अडकत आहेत. लॉकडाउन मुळे अनेकांचे साखरपुडा किंवा ठरलेली लग्न लॉक झाल्यासारखीच झाली होती. पण नंतर सरकारने केलेल्या नियमाने लग्न सराई पुन्हा सुरू झाली.
कार्तिकीनं आत्तापर्यंत खुप काम केलं आहे. लोकगीत हा तिच्या खूप आवडीचा प्रकार आहे. तिचे अनेक गायलेली गाणी खूप व्हायरल झालेली आहेत. या सगळ्या प्रवासात बाळकडू ज्यांच्याकडुन मिळालं त्या वडिलांचा खूप मोलाची साथ तिला मिळालेली आहे. २६ जुलै ला तिचा साखरपुडा पार पडला. कार्तिकी गायकवाड ला तिच्या नव्या इनींग साठी खूप साऱ्या शुभेच्छा !… साखरपुड्याचे फोटो:
.
.