मराठी गायिका कार्तिकी गायकवाडच्या लग्नात तिच्या वडिलांनी दिली महागडी कार गिफ्ट, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

कार्तिकी गायकवाड आज अवघ्या महाराष्ट्राचा संगित आणि गायनाचा परिचित असलेला चेहरा. कार्तिकी म्हटलं की सर्वांना सर्वप्रथम तिने गायलेली, “घागर गेऊन निघाली” ही भन्नाट गवळण आठवते. आणि सोबतच प्रत्येकाच्या तोंडातून कार्तिकीच्या गायनकौशल्यासाठी आपसुकच वाह वा निघते.

maharashtra times

कार्तिकी सा रे गा मा लिटल चॅम्प्स पर्वाची विजेती ठरली होती आणि त्यावेळी लहान वयात आपल्या सुरेल आवाजाने तिने तमाम महाराष्ट्रीयांची मन जिंकली होती. त्या पर्वात मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर हे जबरदस्त चारही गायक होतेच.

आणि त्या लिपल चॅम्प्सच्या भागातील पर्वाला “पंचरत्न” असं नाव देण्यात आलं होत. त्यावेळी ते जरी केवळ एक नाव वाटतं असलं तरी आज ते पाहताना, त्या पाचही जणांमधील कौशल्याकडे पाहताना जाणवतं की “पंचरत्न” हे नाव या खऱ्याखुऱ्या पाच गायनाच्या रत्नांमुळे सार्थक झालं होतं.

untitled 23 1607761214

आता मुद्याची बात म्हणजे, आपल्या लाडक्या आणि त्या पर्वाची विजेती कार्तिकी हिचं नुकतचं लग्न पार पडलं आहे. तिच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर अक्षरश: धु’मा’कू’ळ घातला आहे. कार्तिकी नुकतीच काही दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातदेखील येऊन गेली.

“रोनत पिसे” या आपल्या पतीसोबत ती कार्यक्रमात आली होती. कार्तिकी गायनाचे लाईव्ह शोजदेखील करते. कार्तिकी गेल्या महिन्याभरातच विविहबंधनात अ’ड’क’ली आणि आपल्या लाडक्या मुलीला वडीलांनी चक्क थेट आश्चर्यकारक भेट देत आनंदाचा सुखद ध’क्का दिला.

maharashtra times

कार्तिकीचा लग्नसोहळा पार पडला, सोशल मीडियावर फोटोंना उधाणही आलं. परंतु यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सध्या सर्वत्र तिच्या वडीलांनी भेट म्हणून दिलेल्या महागड्या गाडीचीच चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतं आहे.

एक अगदी महागडी लक्झरीयस कार चक्क तिच्या वडीलांनी तिला भेट म्हणून दिली, ही कार दुसरीतिसरी कोणती नसून थेट मर्सिडीज ई-क्लास आहे. सर्वांना कार्तिकी व तिच्या वडीलांसाठी ती किती लाडाची लेक आहे, हे ठाऊकच आहे.

maxresdefault 1

अशा या आपल्या लाडक्या लेकिसाठी वडिलांनी इतकं महागडं गिफ्ट देऊनही टाकलं. जुन महिन्यात कार्तिकीच्या घरी कांदेपोहे अर्थात स्थळ पाहण्याचा कार्यक्रम पार पडला, त्याचेही फोटो प्रसिद्ध झाले होते. कार्तिकीच्या वडीलांच्या मित्राच्या मुलाबरोबरच कार्तिकी विवाहबंधनात अडकली. रोनतचा स्वत:च्या व्यवसाय आहे. महत्वाच म्हणजे तो, मॅकेनिकल इंजिनिअर आहे. तर आता दोघांच्याही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment