यंदाची करवा चौथ आहे खूपच विशेष, जाणून घ्या कधी आहे ही चतुर्थी, व्रताचा शुभ मुहूर्त, चंद्रोदय, पूजन विधी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

समस्त सवाष्ण महिलांचा सुंदर सौभाग्याचा सण करवा चौथ-(चतुर्थी) यंदाच्या वर्षी ४ नोव्हेंबर २०२० रोजी साजरा करण्यात येत आहे.

 • या दिवशी स्त्रिया निर्जला उपवास ठेवतात आणि रात्री चंद्र दर्शन घेऊनच आपला उपवास सोडतात.
 • या दिवशी जर सवाष्ण स्त्रिया पतीच्या दीर्घायुसाठी तसेच सुखी, समाधानी आणि आनंदी कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनासाठी हे व्रत व उपवास करतात.
 • हा उपवास सूर्योदयापूर्वी सुरू होऊन चंद्रोदय होई पर्यंत करतात.
 • या उपवासात संध्याकाळच्या वेळी चंद्रोदयाच्यापूर्वी शुभमुहूर्तावर भगवान श्रीशिवशंकरांची पार्वती, गणेश, कार्तिकेय यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची पूजा करतात.

चंद्रोदयानंतर स्त्रिया चंद्राला अर्ध्य देतात आणि आपल्या पतीच्या हातून पाणी पिऊन उपवास व्रत पूर्ण करतात. हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्याच्या कृष्णपक्षात चतुर्थी तिथीला करवा चौथ किंवा चतुर्थी साजरी करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, यश -कीर्ती, सौभाग्य वाढण्यासाठी या व्रत उपवासाला अतिशय शुभं फलदायी मानतात.

See also  पापमोचनी एकादशीचा अद्भुत योगायोग, जाणून घ्या या तिथीचे धार्मिक महत्व, शुभमुहूर्त व पूजाविधी सविस्तर...

यंदा करवा (चौथ) चतुर्थीचे शुभ मुहूर्त – 

बुधवार दि. ४ नोव्हेंबर २०२० रोजी : संध्याकाळी ५ वाजून ३४ मिनिटांपासून ६ वाजून ५२ मिनिटापर्यंत. करवा चौथच्या संध्याकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे. या वेळेत पूजा करावी. व्रत सोडण्यासाठी या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी ७ वाजून ५७ मिनिटाला होणार आहे. (महाराष्ट्रात ८ वा. ४४ मि.)

करवा चौथ व्रत पूजन विधी – 

 • सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठावे. घरातील देवतांची पूजा करून निर्जला उपवासाचा संकल्प घ्यावा.
 • या दिवशी स्त्रिया संपूर्ण दिवस अन्न-जल काहीच ग्रहण करत नाहीत. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन करूनच पतीच्या हस्ते व्रत उपवासाची सांगता करावी.
 • पूजेसाठी संध्याकाळच्या वेळी एका मातीच्या वेदीवर सर्व देव स्थापित करून या मध्ये करवे (मातीचा तांब्या) ठेवावा.
 • एका पूजन थाळीत धूप, दिवा, चंदन, शेंदूर, ठेवून तुपाचा दिप लावावा.
 • पूजा चंद्रोदयाच्या किमान १ तासापूर्वीच सुरू करावी. काही ठिकाणी या दिवशी सर्व स्त्रिया मिळून एकत्ररित्याही पूजा करतात.
 • पूजेच्या वेळी करवा चौथची व्रतकथा आवर्जून श्रवण किंवा कथन करावी.
 • चाळणीतून चंद्रदर्शन करून अर्ध्य देऊन चंद्राची पूजा करावी.
 • चाळणीतून चंद्रदर्शन करून पतीच्या हातून पाणी पिऊन मगच व्रत उपवासाची सांगता करावी.

या दिवशी सुना आपल्या सासूला एका ताटात मिठाई, फळ, सुकेमेवे, दक्षिणा आदि. देऊन त्यांच्या कडून सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद मिळवतात.

चंद्राला अर्ध्य देताना म्हणावयाचे मंत्र –

करकं क्षीरसंपूर्णा तोयपूर्णमयापि वा। ददामि रत्नसंयुक्तं चिरंजीवतु मे पतिः॥
इति मन्त्रेण करकान्प्रदद्याद्विजसत्तमे। सुवासिनीभ्यो दद्याच्च आदद्यात्ताभ्य एववा।।
एवं व्रतंया कुरूते नारी सौभाग्य काम्यया। सौभाग्यं पुत्रपौत्रादि लभते सुस्थिरां श्रियम्।। 

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.

See also  काय आहे मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी बहुसंख्य श्रद्धाळू स्त्रीवर्गाद्वारे मनोभावे वाचली जाणारी श्री महालक्ष्मी कथा?

शुभं भवतु: !

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment