अर्रर्र विमान चालले चक्क रस्त्यावरून, काय आहे नेमका हा प्रकार घ्या जाणून…
“आकाशी विमान चाले भुर् भुर्” मित्रांनो आपण आकाशातून विमान उडताना कित्येकदा पाहिले असेल. ते पाहून जसा लहान मुलांना अत्यानंद होतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा खूप भारी वाटते. रस्त्यावरून चालणारी वाहने बंद पडली की त्यांना धक्का मारून चालवता तर येते. अहो, परंतु विमानाला धक्का मारून चालू कसं बुवा करणार. तुम्हांला ठाऊक आहे का, नेपाळमध्ये एक अशी घटना घडली आहे. जिथे चक्क विमानाला धक्का द्यावा लागत आहे.
परंतु नेमकं काय घडलं असावं, हा विचार तुमच्या सुद्धा ङोक्यात आलाच असेल. त्याचे झाले असे की, नेपाळच्या बजराच्या कोल्टी विमानतळावर ही घटना घडली आहे. या विमानतळावर तारा एअरलाईन्स च्या एका विमानाचा टायर फुटला. त्यामुळे ते रणवे वरच फसले. हे विमान अडकल्याने इतर विमानांना मात्र उतरताच येईना. त्यातच तेथील विमानतळावर टोईंगची सुविधा देखील उपलब्ध नव्हती…शेवटी काय करावे, हे सुचेनासे झाले.
सायद हाम्राे नेपालमा मात्र होला ! pic.twitter.com/fu5AXTCSsw
— Samrat (@PLA_samrat) December 1, 2021
मग काय करणार, शेवटी एकच ऑप्शन उरला. तो म्हणजे दे धक्का….त्यानंतर मग विमानतळावरील सुरक्षा रक्षक आणि विमानातील सर्व प्रवाशांनी शेवटी या विमानाला धक्का दिला. “जोर लगा केऽऽऽऽ” असे म्हणत या सर्व मंङळीनी विमान रनवेपासून खूप दूर नेलं. नेपाळमधील या विमानतळावरील हा मजेशीर प्रकार सध्या सर्वत्र जोरदार वायरल होत आहे.
हा प्रकार जरी गंमतीशीर असला तरीही प्रशासनाने मात्र याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, असे म्हटले जात आहे. कारण या प्रकाराने कोणतीही गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे लोकांनी या घडल्या प्रकाराचे सूर आवळण्यास देखील सुरुवात केली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.