कतरिना कैफची फॅमिली आहे बरीच मोठी, तिचे सगळे बहीण-भाऊ करतात हे काम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अभिनेत्री कतरिना कैफ हिची स्वतःची अशी एक अनोखी छाप आहे. म्हणून तर ती टॉप अभिनेत्रींमध्ये मानली जाते. कतरिनाच्या फिल्मी लाइफविषयी तर सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र खूप लोकांना तिच्या कुटुंबाविषयी माहीती आहे. तर मित्रांनो कतरिना कैफ च्या संपूर्ण कुटुंबात किती सदस्य आहेत, त्यांपैकी कोण- कोण काय करत आहेत, हे आज आम्ही तुम्हांला या आर्टीकल मधून सांगणार आहोत.

कुटुंब म्हटलं की सर्वांत नंबर वन वर असते, ती म्हणजे आई. कतरिनाची आई काय बरं करते…तर मित्रांनो अभिनेत्री कतरिना कैफ ची आई Suzzane Turquotte ह्या एक सोशल वर्कर आहेत. आतापर्यंत त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांचं भलं करण्याचं घालवलं. आजही त्या समाजकार्यात मोठ्या हिरीरीने भाग घेतात. त्यांनी आतापर्यंत भारतातील अनेक चॅरिटी प्रोजेक्टस मध्ये सहभाग घेतला आहे.

See also  बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाच्या प्रेमात पडलीये हि प्रसिद्ध अभिनेत्री, चर्चांना आले उधाण...

कतरिना ची सर्वांत मोठी बहीण स्टिफनी. ही सर्व भावंडांमध्ये मोठी आहे. कतरिनाच्या लहानपणीच्या फोटोज् मध्ये आपल्याला तिला पाहता येईल. स्टिफनी ला कॅमेर्यापासून दूर राहायला आवडते. आपल्या कुटुंबासोबत ती प्रायव्हेट लाइफ जगणे पसंद करते. कतरिनाचा एकुलता एक भाऊ हा दुसर्या क्रमांकावर आहे. तो एक फर्निचर ङिजाइनर आहे. त्याचा त्याच्या कामासंबंधित एक ब्लॉग सुद्धा आहे. मायकल ला फिरण्याची खूप आवङ आहे. त्याचप्रमाणे तो एक प्रोफेशनल Skier देखील आहे.

क्रिस्टीन ही कतरिनाची तिसऱ्या नंबरची बहीण आहे. तिचं लग्न झालं असून ती एक होममेकर आहे. ती सुद्धा कॅमेर्यापासून दूर राहणे पसंत करते. कतरिनाच्या चौथ्या बहिणीचे नाव आहे नताशा. नताशा ही एक टॅलेंटेङ असून ती ज्वेलरी ङिजाइनर सुद्धा आहे. कतरिना ने आपल्या बहिणीने ङिजाइन केलेली ज्वेलरी बरेचदा परिधान केलेली आहे.

See also  या कारणामुळे अरिजीत सिंग आणि सलमान खान एकमेकांना बोलत नाहीत, सलमानला आहे या गोष्टीचा राग...

पाचव्या नंबरवर कतरिना असून मेलिशा ही तिची बहीण सहाव्या नंबरवर आहे. ती शिक्षणाच्या बाबतीत खूप हुशार आहे. मेलिशा ही एक मॅथमॅटेशियन आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार मेलिशा ने 2009 मध्ये इंपेरियल कॉलेजमध्ये नामांकित “Laing O Rourke Mathematics” अवॉर्ड जिंकला होता.

सातव्या नंबरवर कतरिनाची लहान बहीण इसाबेल ही आहे. ती एक मॉडेल व अभिनेत्री आहे. 2021 मध्ये इसाबेल ने टाइम टू ङान्स मधून बॉलीवुड मध्ये ङेब्यू केला होता. कतरिनाची सर्वांत धाकटी बहीण सोनिया. ही एक उत्कृष्ट फोटोग्राफर आणि ग्राफिक ङिजाइनर आहे. कतरिना चे आपल्या सगळ्या भावंङासोबत खूप घट्ट बॉन्डिंग आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment