कॅटरिना-विकीला मिळाली धमकी, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी खळबळजनक बातमी वाऱ्यासारखी पसरत असते. या बातमीमुळे सगळीकडचे वातावरण गंभीर होऊन जाते. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड अभिनेत्री कतरीना आणि तिचा नवरा विक्की कौशल या दोघांना ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. ही व्यक्ती अज्ञात असून तिच्या विरुद्ध विक्कीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. खूप दिवसांपासून अभिनेत्री कॅटरिनाला धमकीचे कॉल येत होते. तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने तिचे सर्व चाहते देखील तिची खूप काळजी करत आहेत. सोशल मीडियावर तिला अनेकजण विचारपूस करत आहे.

खूप काळापासून एक इसम कॅटरिनाला स्टॉक करत होता, पण विक्की याबाबतीत काहीच माहिती न्हवती. पण ज्यावेळी त्याला कळले त्यावेळी त्याने त्या इसमाला खूप समजावले, त्या समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तो इसम अजिबात ऐकत न्हवता. त्याने आपली पातळी ओलांडली, तो अति करू लागला. त्याच्यामुळे अभिनेत्रीला देखील खूप मानसिक त्रास झाला ,अभिनेता विक्की कौशल याला देखील याबाबतीत मानसिक त्रास झाला आहे. सोशल मीडियावर या घटनेची विशेष चर्चा सुरू झाली आहे.

See also  नेहा कक्करने केले तिच्या पेक्षा 7 वर्षांनी लहान रोहनप्रीत सिंगशी लग्न, कारण...

माहिती मिळाली आहे की त्या व्यक्तीचे नाव आदित्य राजपूत असे आहे. आदित्य खूप जास्त हट्टी आहे, त्याने अभिनेत्री कॅटरिनाला खूप त्रास दिला आहे. विक्की कौशलला हे जेव्हा कळले तेव्हा त्याने आदित्य सोबत बोलणी केली, त्याने त्याला खूप समजावले. पण आदित्यने त्याचे काहीच ऐकले नाही. शेवटी मग विक्कीने पोलिसांची मदत घेतली, त्याने हा सर्व प्रकार पोलिसांना कथन केला. मिळालेल्या माहितीनुसार आदित्य राजपूत हा फेसबुकवर ऍक्टिव्ह आहे. पण त्याचे हे अकाउंट खरे आहे की खोटे हे देखील माहीत नाही.

तक्रार केल्याने सांताक्रूज पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आईपीसी धारा ५०६-|| (अपराधी धमकी) आणि ३५४-D (पाठलाग करणे) नुसार तक्रार दाखल केली आहे. इतकेच नव्हे तर २९ मे रोजी दिवसा ढवळ्या पंजाबचा प्रसिद्ध सिंगर सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली होती. या घटनेने बॉलिवूड मध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सिंगरची हत्या झाल्यानंतर अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमानचे वडील सलीम खान यांना सकाळी फिरायला गेले असताना सलमानच्या नावाने पत्र मिळाले होते.

See also  एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 12 जणांसोबत या अभिनेत्रीचे होते अफेयर, शेवटी कंटाळून केले तिने लग्न...

यामध्ये सलमानला ठार करण्याची धमकी देण्यात आली होती. आता बॉलिवूड मधील क्युट कपल कॅटरिना आणि विक्की कौशल यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गेल्या वर्षी या दोघांनी ९ डिसेंबरला जोधपूर मध्ये शाही अंदाजात लग्नसोहळा पार पाडला आहे. त्या दोघांचे सोशल मीडियावर अनेक फोटो पाहायला मिळतात. दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत आहे. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment