कतरिना- विक्की यांना लग्नात मिळेल करोडोंचे गिफ्ट, पहा रणबीर आणि सलमान खान काय दिलेत गिफ्ट्स…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील क्यूट कपल विक्की कौशल आणि कतरिना कैफ हे नुकतेच विवाहबंधनात अडकले. यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. या शाही विवाह सोहळ्याच्या फोटोंनी इंटरनेटवर अक्षरश: धूमाकळ घातला. तर आता विक्की व कतरिना यांना लग्नात काय काय गिफ्ट्स मिळाले, याची जोरदार चर्चा होत आहे. लग्नामध्ये या स्टार कपलला कुणी कोणत्या भेटवस्तू दिल्या, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते देखील तितकेच उत्सुक आहेत.
विक्की व कतरिना यांच्या लग्नात अगदी मोजकेच सेलिब्रिटीज उपस्थित होते. मात्र जे हजर नव्हते, त्यांनी देखील या कपलला अतिशय महागडी व सुंदर गिफ्ट्स दिली आहेत. अगदीच म्हणजे बॉलीवुडचा दबंग स्टार सलमान खान पासून ते अगदी रणबीर कपूर पर्यंत सर्वांनी विक्की व कतरिना यांना एकापेक्षा एक सरस अशी गिफ्ट्स दिली आहेत.
मीडियाच्या माहितीनुसार कतरिना कैफला तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि बॉलीवुडचा भाईजान सलमान खान याने तब्बल तीन कोटींची “रेंज रोव्हर” भेट दिली आहे. भाईजान हा कॅटच्या लग्नाला हजर नव्हता. मात्र तिला महागङं भेटवस्तू त्याने अगदी आठवणीने दिले. त्याचप्रमाणे विक्की सोबत लग्न करण्याआधी कतरिना रणबीर कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये होती. एकेकाळी त्यांच्या अफेयर्स च्या जोरदार चर्चा होत होत्या. मात्र आता तो भूतकाळ झाला आहे.
बॉलीवुडची कतरिना कैफ आता मिसेस कौशल बनली आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार रणबीर कपूरने तिला लग्नात 2.7 कोटींचा एक हिऱ्यांचा हार भेट केला आहे. तर रणबीरची सध्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री आलिया भट्ट हिने कतरिनाला लाखो रुपयांचा परफ्यूमचा एक सेट भेट म्हणून दिला आहे. अभिनेता शाहरूख खान याने कतरिनाला लग्नाची भेट म्हणून एक स्पेशल पेंटिंग दिल्याचे समजते. तर हृतिक रोशन ने विक्की व कॅटला BMW G310 R ही तीन लाखांची बाईक भेट केल्याचे समजते.
अभिनेत्री तापसी पन्नू हिने विक्की कौशल सोबत “मनमर्जिया” मध्ये काम केले होते. तापसी ने विक्की ला एक प्लॅटिनम ब्रेसलेट भेट म्हणून दिले आहे. याची किंमत तब्बल दीड लाख आहे, असे म्हटले जाते. मागील कित्येक दिवसांपासून कतरिना व विक्की कौशल यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. 9 ङिसेंबरला हे लवबर्ङ विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले गेले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.