जाणून घ्या कात्यायनी माताची माहित नसलेली अदभूत कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

देवी कात्यायनी माता : कात्यायनी हे मातेचे मातृत्वाचे वैशिष्टय़ दर्शवणारे रूप आहे. मातेच्या या रूपामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत, असे मानले जाते. कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी कात्यायनी मातेची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. या सगळ्याला साजेसा वर या मातेच्या आराधनेतून मिळतो, अशी श्रद्धा आहे.

त्यामुळे ही माता नातेसंबंधामधील उच्च गुणांची प्रतीक मानली जाते. आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय. तो कात्यायनी मातेशी जोडला गेला आहे, हे तिचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. दुर्गेचे हे आगळेवेगळे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या मातेची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘आज्ञा’ या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनी मातेच्या चरणी आपले सर्वस्व वाहतो. परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला माता सहजपणे दर्शन देते, अशी श्रद्धा आहे.

देवी कात्यायनी मातेची कथा : दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा सांगितली जाते. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनांचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्षे भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका मातेला उत्पन्न केले.

See also  नवरात्री मध्ये चुकूनही करू नका हे 7 काम नाही तर दुर्गा माता होतील नाराज...

महर्षी कात्यायनाने या मातेची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या माताला कात्यायनी माता असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या माताने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी माताने महिषासुराचा वध केला होता, अशी ही कथा पुराणात प्रसिद्ध आहे. कात्यायनी अमाप फलदायक मानली जाते.

यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या मातेची पूजा केली होती, असे मानतात. ही माता ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. मातेच्या उजव्या बाजूकडील वरच्या हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे.

See also  आजची नवदुर्गामाता आहे माता ब्रह्मचरिणी, जाणून घ्या माता ब्रह्मचरिणी व्रतकथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

तिचे वाहन सिंह आहे. कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळांची सहजतेने प्राप्ती होते. इहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. तिची मनापासून पूजा करणाऱ्याला रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्ती मिळते. सात जन्माचे पा’प न’ष्ट करण्यासाठी कात्यायिनी मातेची उपासना करणे आवश्यक मानले जाते.

देवी कात्यायनी माता पूजन विधी : सर्वात प्रथम पूजेचा संकल्प सोडावा. त्यानंतर एक फूल हातात घेऊन पूजेच्या साहित्यावर थोडं पाणी िशपडून तोंडाने ‘ॐ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा। य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्यभ्यन्तर: शुचि:॥’ हा मंत्र म्हणावा. नंतर दिवा लावून त्याला कुंकू-हळद, फुलं अक्षता वाहाव्यात. अगरबत्ती लावून घ्यावी. नंतर चौरंग ठेवून त्यावर कलश स्थापन करून घ्यावा. त्याला देखील कुंकू-हळद, फुलं, अक्षता वाहावे. आणि विडय़ाची पाने लावून नारळ ठेवावा. मग फुलं वाहून गणेशाची पूजा करून घ्यावी. त्यानंतर फुलं वाहून दुर्गेची पूजा करावी. तिला पंचामृताने स्नान घालावे. कुंकू-हळद, फुलं अक्षता वाहावे. धूप, दीप नवेद्य दाखवून आरती करावी. स्तोत्र पठन करावे.

देवी कात्यायनी माता स्तोत्र

कंचनाभा वराभयं पद्मधरा मुकटोज्जवलां।
स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनेसुते नमोस्तुते
पटाम्बर परिधानां नानालंकार भूषितां।
सिंहस्थितां पदमहस्तां कात्यायनसुते नमोस्तुते
परमांवदमयी देवि परब्रह्म परमात्मा।
परमशक्ति, परमभक्ति, कात्यायनसुते नमोस्तुते

देवी कात्यायनी माता पूजन महत्व : माता कात्यायनीची आज पूजा केल्याने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचे फळ मिळते, अशी श्रद्धा आहे. तिच्या सहवासात राहिल्याने साधक दुख, राग, भय यातून मुक्त होतो. कामाच्या समस्या सोडविल्या जातात. उत्पन्न वाढते आणि बेरोजगारांना रोजगार मिळतो, असे मानले जाते.

See also  जाणून घ्या महागौरी माताची माहित नसलेली अदभूत कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment