“कौन बनेगा करोडपती” मधील ही लाईफलाईन होणार रद्द, त्यामागचे कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

यंदाच्या “कौन बनेगा करोडपती” या लोकप्रिय गेम शो मधील स्पर्धकांचा लाइफलाइनचा एक पर्याय झाला रद्द? कोणता होता हा पर्याय? आणि का करावा लागला रद्द? चला जाणून घेऊ या…

यंदा ‘कौन बनेगा करोडपती’ या गेम शो मध्ये स्पर्धकांसाठी असलेली “ऑडियन्स पोल” ही लाईफलाईन नाहीशी होणार असल्याचे समजते आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’चं नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘केबीसी’चं हे १२ वं पर्व असून नुकतेच हा शो तयार करणाऱ्या शो मेकर्सनी “केबीसी” च्या सेटवरील काही फोटो मीडियामध्ये शेअर केले आहेत. मात्र या केबीसी च्या या १२ व्या नव्या पर्वात अनेक नवे बदल केल्याचं पाहायला मिळत आहे.

See also  जय मल्हार च्या धुमधडाक्या नंतर धडाकेबाज महेश कोठारेंची नवी कोरी मालिका येतेय प्रेक्षकांच्या भेटीला.

विशेष म्हणजे यंदाची ‘केबीसी’ची थीम ही सध्याच्या करोना आणि लॉकडाउन काळावर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि या नवीन पर्वात स्पर्धकांसाठी असलेला ‘ऑडियन्स पोल’ हा लाइफलाइन पर्याय उपलब्ध नसेल, असं सांगण्यात येत आहे.

करोनाचा संक्रमणाच्या या कठीण काळात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या प्रत्येक ठिकाणी काटेकोर नियमांचे पालन करुन काळजी घेतली जात आहे. या नियमांच्या पालनासाठी मालिका, चित्रपट किंवा रिऍलिटी शो, गेम शो, यांच्या चित्रीकरणाच्या सेटवरही आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्यात येत आहेत.

करोना व लॉकडाऊनमुळे यंदा ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नसल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकच आता या शोमध्ये नसल्यामुळे यंदाच्या या १२व्या पर्वात स्पर्धकांसाठी ‘ऑडियन्स पोल’ हा लाइफलाइनचा पर्याय नसल्याचं सांगण्यात येत आहे.

See also  आत्ताच या शेअर्समध्ये गुंतवणूक करा आणि व्हा लखपती ! मिळवा 15 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न ! 

नुकतीच काही दिवसांपूर्वी या शोच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. या सेटवरील काही फोटो शो चे होस्ट अमिताभ बच्चन यांनी मिडियासोबत शेअर केले होते. त्यात सेटवर केबीसी चे क्रू मेंबर्स पीपीई किट्स घालून काम करताना दिसत होते.

मुख्य म्हणजे या करोना संक्रमण काळात जुलै महिन्यात स्वतः अमिताभ बच्चन यांनाही करोनाची लागण झाली होती. जवळपास चार आठवडे नानावटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर २ ऑगस्ट २०२० रोजी अमिताभ यांना घरी सोडण्यात आले होते. करोनावर मात करून अमिताभ बच्चन पुन्हा त्यांच्या कामात मग्न झाले असून सध्या ते केबीसी च्या या नवीन भागांच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. नवीन बदल आणि नवीन नियमांसह यंदाचा हा केबीसी चा खेळ कसा रंगतो? याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

See also  ब्रेकिंग न्यूज ! अफगाणिस्तानमध्ये काबूल विमानतळावर झाला मोठा द'हशतवादी ह'ल्ला...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment