“शोले” मधील जबरदस्त कव्वाली, जी कायमच रसिकांसाठी अज्ञात राहिली, रेकॉर्डिंग होऊनही, केवळ या कारणामुळे नाही होऊ शकली चित्रीत…

‘शोले’ च्या मूळ स्क्रिप्ट मध्ये सुप्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी रचना केलेली एक कव्वाली सुद्धा समाविष्ट होती. पण एका कारणामुळे तिचे रेकॉर्डिंग होऊन सुद्धा शूटिंग होऊ शकले नाही. काय होते ते कारण जाणून घेऊ या…

शोले हा चित्रपट माहीत नाही असा चित्रपट रसिक सापडणे शक्यच नाही. संपूर्ण चित्रपट पाठ असणारे आणि शोलेची अक्षरशः पारायणे करणारे रसिक आपल्याला सापडतील. पण शोले च्या ओरिजनल स्क्रिप्ट मध्ये मध्ये एक जबरदस्त कव्वाली होती हे फारसे कुणालाही ठाऊक नाही.

soorma

आनंद बक्षी यांची ही कव्वाली भोपाळच्या सुप्रसिद्ध ‘चार भांड’ या शैलीत चित्रित करावी, अशी जावेद अख्तरची इच्छा होती. या चार भांड शैलीमध्ये कव्वालांचे चार गट एकमेकांविरूद्ध स्पर्धा करतात. ही कव्वाली चित्रपटात तील विनोदवीर जगदीप यांचे गाजलेले कॅरेक्टर सुरमा भोपाली च्या ट्रॅकचा एक भाग होती.

किशोर कुमार, मन्ना डे, भूपिंदर आणि स्वतः आनंद बक्षी असे चार तगडे गायक सुद्धा ही कव्वाली गाण्यासाठी निवडले गेले. रेकॉर्डिंग साठी भोपाळ येथून ‘चार भांड’ गाणारे इतर कव्वाल सुद्धा बोलावले होते. पंचमदा बर्मन यांनी चाल लावली आणि या जबरदस्त कव्वालीचे रेकॉर्डिंग सुदधा झाले, पण चित्रिकरण मात्र झाले नाही कारण…

b591f21d61af99f6b0ee30cd9c04a426

चित्रपटाची लांबी खूप मोठी झाली. शेवटी, लांबीच्या या एका कारणामुळे या जबरदस्त कव्वालीवर कात्री चालवावी लागली. कव्वाली कापुनही शोलेची लांबी आहे ३ तास २४ मिनिटे. या घटनेमुळे मुळे गीतकार आनंद बक्षी खूपच नाराज झाले होते. चित्रपट रसिक ज्या जबरदस्त कव्वालीला मुकले, त्या कव्वालीचे शब्द होते-

“चांद सा कोई चेहरा ना पहलू में हो तो चांदनी का मज़ा नहीं आता।
जाम पीकर शराबी ना गिर जाए तो मैकशी का मज़ा नहीं आता।”

आनंद बक्षी फिल्म इंडस्ट्रीचे एक असे गीतकार होते की, ज्यांचे गाणे आजही सदाबहार आहेत. एकूण साडेपाचशे चित्रपटांकरिता त्यांनी सुमारे चार हजार गाणी लिहिली, त्यापैकी शेकडो गाणी आजही रसिकांच्या हृदयावर राज्य करतात. पण तरीही ‘शोले’ चित्रपटासाठी लिहिलेल्या त्यांच्या कव्वालीचे शेवटच्या क्षणी शूटिंग झाले नव्हते, तेव्हा त्यांना या घटनेबद्दल अतिशय वाईट वाटले होते.

त्यांच्या गाण्यांसाठी त्यांना ४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता आणि ते तब्बल चाळीस वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित सुद्धा झाले होते. आजारपणामुळे वयाच्या ७१ व्या वर्षी ३० मार्च २००२ रोजी त्यांनी जग सोडले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment