‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये अमिताभ बच्चन जो सूट घालतात त्याची किंमत ऐकून थक्क व्हाल!
‘कौन बनेगा करोडपती’ चा 12 वा सीजन सुरू झाला आहे. आधी पासूनच या शोबाबत चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता वाढली आहे. कौन बनेगा करोडपती 12 हा शो यावेळी बर्याच बदलांसह सुरु झाला आहे. परंतु, काही गोष्टी पूर्वीसारख्याच आहेत. जे बदलले नाहीत त्यांच्यापैकी एक म्हणजे शोचा सेट आणि शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांचे दिसणे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या अंदाजात शोची सुरुवात केली.
भोपाळच्या अण्णा नगर येथील झोपडपट्टीत राहणारी 20 वर्षीय आरती जगतापने कौन बनेगा करोडपतीमध्ये 6.40 लाख रुपये जिंकले आहेत. लॉ’क’डा’उ’ननंतर ती प्रथम स्पर्धक म्हणून शोमध्ये सामील झाली होती. आरती जगताप अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अमिताभ बच्चन यांनी शोचे शूट सुरू असलेल्या सेटवरून अनेक वेळा आपला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रत्येक वेळी अमिताभ परफेक्ट गेटअपमध्ये सूट, ब्लेझर, टाय, फॉर्मल स्कार्फ, ब्रूच पिन घालताना दिसतात.
त्यांच्या या परिपूर्ण लुकमागील कठोर परिश्रम तसेच या गेटअपची किंमत किती मोजावी लागते हे तुम्हाला माहित आहे का? अमिताभ यांच्या या खास गेटअपसाठी लाखोंची किंमत मोजावी लागते. एका अहवालानुसार, अमिताभ यांच्या प्रत्येक एपिसोडमध्ये वार्डरोब वापरतात त्यांच्या वार्डरोबची किंमत 10 लाख रुपये असते.
शोमध्ये अमिताभची स्टायलिस्ट प्रिया पाटील यांनीही त्यांच्या लूकबद्दल चर्चा केली होती. प्रियाने सांगितले होते की थ्री पीस सूटची कल्पना नवीन आहे. ब्रॉच पिनची कल्पना अमिताभ यांनी दिली होती. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या रॉयल वेडिंग्जमधून ही कल्पना आली होती.
टाय नॉट्स, एल्डरेज नॉट, ट्रिनिटी नॉट, रोझ नॉट, रीसरेक्शन नॉट इत्यादींचा प्रयोग देखील करण्यात आला. बिग बी अमिताभ यांच्या सूटचे कापड इटलीहून मागवले जाते, कारण बिग बी अमिताभ यांना ‘120 थ्रेड काउंट’ वाले कपडे आवडतात. इतकेच नाही तर सूटची बटणेही इंपोर्टेड असतात.
प्रियाने अमिताभ यांच्या निवडीबद्दल सांगितले की बिग बींना क्लासिकल लूक आवडतो आणि शो साठी देखील तो लुक फिट आहे. त्यांना गडद रंगांचे ब्लॅक-वाईन सारखे सूट घालायला आवडतात. अशा बारीकने निवडलेल्या कपड्यांमध्ये अमिताभ खरोखरच भव्य दिसतात. प्रत्येक वेळी त्याच्या ग्रँड एन्ट्रीने चाहते खूप आनंदित होतात.
रिपोर्ट्सनुसार, अमिताभ एका एपिसोडसाठी 3-5 कोटी रुपये घेतात. गेल्या वर्षी केबीसी सुरू होण्यापूर्वी अनेक बातम्या समोर आल्या होत्या की, अमिताभ एका एपिसोडसाठी दोन कोटी रुपये घेतात, आता त्यात वाढ झाली आहे. आता अमिताभच्या एका एपिसोडसाठी 3 ते 5 कोटी रुपये फीस घेतात. परंतु, अधिकृत माहिती आणखी समोर आलेली नाही.