दुःखद निधन: अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या भावाचं झालं दुःखद निधन….कुटुंबात पसरली शोककळा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो माणूस जोवर आपल्या सोबत असतो तोवर आपल्याला त्याची जाणीव अधिक नसते. नात्यांचे बांध हलके हलके जुळतात, काही जन्मापासून असतात तर काही आपणाला जोडावे लागतात. जी नाती जन्मापासून असतात त्यांच्या सोबत जगण्याची इतकी सवय होऊन जाते की आयुष्य त्यांच्या शिवाय आपण कधी कल्पना करतच नाही. जर कधी आपल्या जवळच माणूस अचानक आपल्याला सोडून गेल तर प्रचंड त्रास होतो. मित्रहो हाच त्रास आता या अभिनेत्रीला व तिच्या घरच्यांना होत आहे. मराठी रंगभूमीवर गाजलेली अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या भावाचे दुःखद निधन झाले आहे.

मराठी मालिका आणि चित्रपट यामध्ये अभिनय साकारणारे सर्वच कलाकार खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी व त्यांच्या आयुष्यात ते साध्य काय करत आहेत हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मित्रहो नुकताच अभिनेत्री आणि गायिका असलेल्या केतकी माटेगावकर हिच्या आयुष्यात दुःखाचे पहाड कोसळले आहे, एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली असून सोशल मीडियावर देखील अनेकजण श्रद्धांजली वाहत आहेत. तिच्या कुटुंबातील सर्व सदस्य फार दुःखी झाले आहेत.

See also  भाऊ कदमने कॉमेडी सोडून सुरू केला नवीन व्यवसाय? पहा काय आहे भाऊचा नवीन व्यवसाय...

अभिनेत्री केतकी हिचा हा चुलत भाऊ होता, त्याने पुण्यात राहत्या घरात आत्महत्या केली आहे. नोकरी मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केली आहे, असे त्याने स्वतः लिहलेल्या चिठ्ठी मध्ये लिखित केले आहे. अक्षय माटेगावकर असे त्याचे नाव होते, वयाच्या २१ व्या वर्षी त्याने चक्क आठव्या मजल्यावरून उडी मारली आहे. अक्षय हा कम्प्युटर सायन्स विभागात चौथ्या वर्षात शिकत होता. माउंट युनिक सोसायटीच्या आठव्या मजल्यावर तो राहत होता. अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत.

अक्षयची जुळी बहीण आकांक्षा माटेगावकर ही एमएससीआयटी विद्यालयात डिझायनिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. ती नांदेड सिटी मध्ये तिच्या चुलत्याकडे राहते. सर्वजण आपापल्या क्षेत्रात व्यस्त असतानाच ही घटना घडली आहे, त्यामुळे सर्वानाच खूप वाईट वाटत आहे. अक्षय आपल्या करिअर बाबतीत खूप सिरीयस होता, त्याच्या नोकरीच्या बाबतीत तो गंभीर होता. नुकतेच त्याने एका आयटी कंपनीत काम केले होते. त्यानंतर काही कंपनीत त्याने अर्ज देखील केले होते मात्र नोकरी मिळवण्यात त्याला यश मिळाले नाही.आता नोकरी मिळणार नाही असं त्याच्या मनावर ठसले, आणि त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

See also  ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्न बंधनात, अभिनेत्रीचे होणाऱ्या नवऱ्या सोबतचे फोटो झाले व्हायरल...

पण मित्रहो आयुष्यात किती जरी अडचणी आल्या तरीही आपण खंबीर राहणे आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनात खंबीर विचार निर्माण करत रहा. आयुष्य सोप्प होईल.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment