‘टाईमपास’ चित्रपटातील प्राजु आता दिसते खूपच ग्लॅमरस, तिचे फोटो सोशल मीडियावर होतायत प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या मराठी सिनेसृष्टीत अनेक गोड सौंदर्यवती अभिनेत्री आहेत. ज्या अक्षरशः इंद्रदरबारातील अप्सरांप्रमाणेच दिसतात. आपल्या मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची अशी एक विशिष्ट जागा बनवली आहे. आपल्या या मराठमोळ्या तारका या अखंड महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयावर वार करतात.

Ketaki Mategaokar Collage e1614159954763

अशीच एक सुंदर, सालस व मोहक सुंदर परी प्रमाणे दिसणारी तुमची- आमची सर्वांची लाडकी अभिनेत्री केतकी माटेगावकर. हो अगदी बरोबर ओळखलंत, सुपरङुपरहिट मराठमोळा टाईमपास या चित्रपटातून प्रसिद्धीत आलेल्या केतकीला आपण सर्वजण ओळखतो.

या चित्रपटातील तिची भूमिका अत्यंत साधी- सरळ व संस्कारी अशी घरंदाज कुटुंबातील मूलीची आहे. या चित्रपटातील तिच्या अप्रतिम भूमिकेमुळे तिचे अभिनय कौशल्य कितपत सुंदर आहे, हे तर आपल्याला माहितच आहे.

See also  "कुणी म्हणतंय गायकवाड वहिनी, तर कुणी म्हणतंय की ऋतुराजची राणी" नक्की काय आहे बरं हे प्रकरण...

Ketaki Mategaokar Collage

मराठमोळी लावण्यवती केतकी माटेगावकर ही आपल्या सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. केतकी च्या मोहक अदाकारी आणि क्यूट अशा फोटोज् ने तर सोशल मीडियावर सध्या खूपच धू’मा’कू’ळ घातला आहे, तिचे सर्व चाहते तिच्या या अप्रतिम लुकिंग फोटोज् ला खूप पसंती देत आहेत. त्यामुळे तिच्या फोटोला खूप छान- छान कमेंट्स सुद्धा मिळत आहेत.

तुम्हांला माहित आहे का, केतकी माटेगावकर ही उत्कृष्ट अभिनयासोबतच अतिशय सुंदर असे गायन सुद्धा करते. म्हणजेच केतकी ही अभिनेत्री तर आहेच, त्याचबरोबर एक गायिका देखील आहे. अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने “शाळा” या चित्रपटापासून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. तर तिने काकस्पर्श, तानी इ. चित्रपटांत देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. परंतु “टाईमपास” या चित्रपटापासून तिला आपल्या करियर मध्ये भरगच्च प्रसिद्धी मिळाली.

See also  हे प्रसिद्ध मराठी कलाकार चक्क दुसऱ्यांदा पडले प्रेमात, हा मराठी अभिनेता तर...

Ketaki Mategaokar

आपल्या करियरच्या सुरूवातीच्या काळात केतकी ही खूपच साधी व सिम्पल राहायची. तसेच सोशल मीडियावर सुद्धा तिचे अत्यंत साधे फोटोज् ती शेयर करत असे. परंतु आता आपल्या क्यूट लुकिंग केतकीने स्वतःचा भन्नाट असा मेकओव्हर करून घेतला आहे. त्यामुळे तिचं हे नवं बोल्ड रूप सध्या तिच्या फॅन्सना अक्षरशः घा’या’ळ करत आहे. आपली ही सिम्पल- ङिम्पल केतकी आता खूपच जबरदस्त लुकिंग दिसत आहे.

केतकी माटेगावकर हिला गायनाची आवङ ही आपल्या कुटुंबातून लागली आहे. तिची आई सुवर्णा माटेगावकर ही एक सुप्रसिद्ध गायिका आहे. तर तिचे वडील उत्कृष्ट पेटीवादक आहेत. त्याचप्रमाणे केतकीने देखील मला वेड लागले प्रेमाचे, पुन्हा एकदा, उठा उठा चिऊताई यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. आपल्या या आवडत्या केतकीला “काकस्पर्श” या चित्रपटातील भूमिकेसाठी “इंटरनॅशनल फिल्म आणि थिएटर” हा अवॉर्ड देखील मिळाला आहे.

See also  'सही रे सही' नाटक का सोडतोय अभिनेता भरत जाधव, सोशल मीडियावर पोस्ट लिहून केला खुलासा!

Ketaki Mategaokar4 e1614160160259

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment