गावरानबाज जपणारं लोकप्रिय युट्यूब चॅनल खास रे टीव्ही!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष पदामुळे संपूर्ण जगात चर्चा होती ती डोनाल्ड ट्रॅम्प ह्या माणसाची. आणि याचवेळी देशात तूफान चर्चा होती ती बाहुबली या सिनेमाची. जगामध्ये डोनाल्ड ट्रॅम्प, देशामध्ये बाहुबली आणि महाराष्ट्रात चर्चेला विशेष उधाण येत होतं ते म्हणजे खास रे टीव्हीच्या ट्रॅम्प तात्याविषयी. कॉमेडी व्हीडीओ असो किंवा मुजिक व्हीडीओ त्यात खास रे चा गावरान बाज आपल्याला पहायला मिळतो. खास रेने आजवर अनेक डबिंग पात्रे तयार केले. जागतिक पातळीवरच्या व्यक्तिमत्वाला पात्र बनवून त्याच्याकडून बोलून घेतली गावाकडची बोलीभाषा. ट्रॅम्प तात्या म्हंटला ‘ज्याच्याकड हाय शेती, त्याला कशाची भीती’ डेडेपूल म्हंटला ‘उन्हातान्हात राहतो कुल नाव माझं डेडपूल’ असं खास रेचं प्रत्येक डबिंग व्हीडीओमधलं पात्र गावरान बाज पकडून बोलताना आपल्याला पहायला मिळालं. आणि ह्याचमुळे खास रेच प्रत्येक पात्र गावाकडच्या आणि शहरामधल्यादेखील माणसाला आपलसं वाटू लागले.

See also  'या मंत्र्यांनी माझे लैं'गिक शो'षण केले', या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला गंभीर आ'रोप, पुरावे देखील केले सादर...

ट्रॅम्प तात्याचे पुढे अनेक डबिंग व्हिडीओज महाराष्ट्राला बघायला मिळाले. ट्रॅम्प तात्या म्हंटला मावा हाय तर, हवा हाय! वावर हाय तर पावर हाय! ज्याच्याकड हाय शेती, त्याला कशाची भीती! खास रे टीव्हीने अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षाला महाराष्ट्राच्या गावात आणून बसवले. नगरपरिषदेची निवडूक लढवणारा, तरूणांना मार्गदर्शन करणारा, गणपती मिरवणुकीवर दिलखुलास बोलणाऱ्या ट्रॅम्प तात्याबद्दल आणि खास रे टीव्हीबद्दल महाराष्ट्राला आपुलकी वाटू लागली. आणि हा खास रे चा प्रवास पुढे खूप काही गोष्टी घेऊन आला.
पुढे जो बायडनही आला त्यानेही मराठीमध्ये संवाद साधला. नगरचा मावा, नगरपरिषदेची निवडणूक जिंकलो असं सगळं गावाविषयी प्रेम निर्माण करेल असं जो बायडन बोलला. आणि ह्या पात्राला देखील तितकीच प्रसिद्धी मिळाली.

Advertisement
See also  शिवजींना बेलपत्र अर्पण करण्यामागे आहे हे शास्त्रीय कारण, जाणून घ्या काय आहे ते कारण...

खास रे डबिंग व्हीडीओज वरतीच नाही थांबले तर, पुढे त्यांनी सैराट आल्यानंतर सिनेमा बनवणे खूप सोप्पं आहे ह्या गैरसमजात असं बऱ्याच लोकांना वाटू लागलं. सगळीकडे निर्माता आणि दिग्दर्शक होण्याचा संसर्ग झाला होता. खरंच सिनेमा बनवणे सोप्पं आहे का ते याडपाट ह्या व्हीडीओमधून विनोदी पद्धतीने दाखवले. गारवा ह्या सुप्रसिद्ध गाण्याचं विडंबनात्मक गाणं ‘गारठा’ हे देखील आपल्याला पहायला मिळाले. विनोदी आणि अप्रतिम असं हे गाणं एकदा नक्की ऐका. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज माणसांना घेऊन त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा असणारा ‘खास रे हॅंगआउट’ हा शो देखील आणला. ह्या शो मध्ये लोकमतचे वरिष्ठ संपादक राजा माने, प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेता अंकुश चौधरी, युवा नेतृत्व रोहित पवार आशा माणसांचा सहभाग होता.

See also  फत्तेशिकस्त चित्रपटातील अभिनेत्री मृण्मयी चा हा आवडता सिम . पहा कोणता सीन आहे तो

सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख मिळवण्याच्या प्रयत्नात असणारा गावातील एका युवा कार्यकर्त्याची भन्नाट अशी कथा ती म्हणजे ‘व्हायरल’ ही वेब सिरिज आली.
यानंतर खास रेकडे आली मराठी सिनेमाच्या प्रमोशनची लाट आली. यातून जन्म झाला खट्याळ, सडेतोड, रोखठोक, सेलिब्रेटीची खेचणाऱ्या निक्की जिगरचा.. थेट भेटच्या माध्यमातून थेट घुसून भेट घेणाऱ्या निक्की जिगरच्या व्हिडीओची आजही लोकं अतुरतेने वाट बघतात. खास रेच्या प्रत्येक कंटेंटला गावाकडच्या मातीचा वास हा येतोचं. म्हणूनच गावरान बाज जपणारं हे युट्यूब चॅनल आहे असं म्हणायला हरकत नाही..

Advertisement

Leave a Comment

close