पुण्यतिथी विशेष: कॉमेडी किंग मेहमूद यांना मिळायचे मुख्य नायकापेक्षा जास्त मानधन, जाणून घ्या त्यांच्याविषयीची रंजक माहिती

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

भारतीय चित्रपटात नायका इतकेच विनोदी अभिनेत्यांनाही महत्व आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आतापर्यंतच्या सर्वात महान विनोदी अभिनेत्यांची यादी केली तर मेहमूद अली यांचे नाव अग्रणी येते. हिन्दी चित्रपटसृष्टीतील किंग ऑफ कॉमेडी म्हणून आपली ओळख निर्माण करणारे मेहमूद अली उर्फ मेहमूद यांनी ‘सीआयडी’ या चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला होता. मेहमूद त्यांच्या विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध होते. तसेच ते एक गायक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते.

29 सप्टेंबर 1932 मध्ये जन्मलेल्या मेहमूद अली यांनी  जवळपास 4 दशके सिनेसृष्टीत काम केले. आपल्या अभिनयाने सर्वांना हसवणार्‍या मेहमूद यांनी  23 जुलै 2004 रोजी सर्वांना रडवत या जगाचा निरोप घेतला. हयात असताना मेहमूद यांनी अनेक लोकांना चित्रपटसृष्टीमध्ये काम दिलं आणि त्यांची शक्य तेवढी मदत केली. आज मेहमूद यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने या लेखात आपण मेहमूदबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.

See also  प्रियांका चोप्राने शिव्या देत पती निक जोनसला गाडीतून बाहेर ढकलले? कारण...

एका टेक मध्येच शॉट ओके…

मेहमूद अली यांच्याविषयी सांगण्यात येते की, त्यांच्या सीनसाठी ते कधीच रिहर्सल करत नव्हते. जो काही सीन आहे ते थेट सेटवर करत असत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे  एका टेक मध्येच सीन ओके करायचे. त्यांना त्या दृश्यासाठी वेळोवेळी रिटेक करण्याची गरज पडत नव्हती. जवळपास 300 चित्रपटात काम करणार्‍या मेहमूद यांना  जवळून ओळखणार्‍या लोकांच्या मते ते एक उत्तम अभिनेते  तर होतेच, त्यासोबतच माणूस म्हणूनही फार चांगले होते.

स्वतःचे सीन स्वतः लिहायचे…

मेहमूदचे अगदी जवळचे आणि शेवटच्या क्षणाला सोबत असलेले मित्र कॉमेडियन बीरबल यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मेहमूद साहेबांनी मला त्यांच्या चित्रपटात प्रथमच काम दिले होते. ते एक उत्तम कलाकार आणि चांगले माणूस होते. ते स्वत:च्या चित्रपटांचे दृष्य स्वतः लिहीत असत. त्यांच्यासारख्या प्रतिभावान व्यक्ती सापडणे अवघड आहे.

See also  "तारक मेहता..." मधील गडा इलेक्ट्रॉनिक्सचा खरा मालक आहे हा व्यक्ती, जाणून घ्या कोण आहे तो व्यक्ती...

मुख्य नायकापेक्षा जास्त मानधन मिळायचे…

मेहमूद एक असे कलाकार होता ज्यांना नायकापेक्षा दुप्पट नव्हे तर तीन ते चार पट पैसे मिळायचे. बिरबल यांनी सांगितले की, 1971 मध्ये आलेल्या ‘मै सुंदर हू’ या चित्रपटासाठी मुख्य नायकापेक्षा मेहमूद यांना जास्त पैसे मिळाले होते. त्या चित्रपटातील मुख्य नायक विश्वजीत होते, त्यांना 2 लाख रुपये मिळाले होते. तर मेहमूद यांना त्याच चित्रपटासाठी 8 लाख रुपये मिळाले होते. तसेच ‘हमजोली’ या चित्रपटासाठी मेहमूद यांनाnollywood  मुख्य नायक जितेंद्रपेक्षा जास्त पैसे मिळाले होते.

असे म्हटले जाते की मेहमूद यांचा एवढा धाक होता की, चित्रपटसृष्टीतील मोठ-मोठे अभिनेते मेहमूद यांना घाबरायचे. प्रेक्षक नायकाच्या नावावर कमी तर मेहमूद यांच्या नावामुळे चित्रपट पाहायला सिनेमागृहात जात असत. ‘कुंवारा बाप’, ‘पडोसन’, ‘गुमनाम’, ‘बॉम्बे टु गोवा’, इत्यादि सुपरहिट चित्रपटांतील मेहमूदच्या अभिनयाची आजही प्रशंशा केली जाते.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment