“देवमाणूस” फेम किरण गायकवाड किरण गायकवाड झाला भावुक, म्हणाला, “देवीसिंगची भूमिका कायम स्मरणात राहील”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मागच्या वर्षी झी मराठी वाहिनीवर सत्य घटनेवर आधारित एक मालिका आली आणि अल्पावधीतच लोकप्रिय झाली. त्या मालिकेचे कथानक साताऱ्यातील गुन्हेगार पोळ डॉक्टरावर आधारित होतं. मालिका प्रोमो पासूनच खूप चर्चेचा विषय बनली होती. त्यातील प्रत्येक एपिसोड चे कथानक आणि त्यात काम करणारे कलाकार यांच्या उत्तम खऱ्या आयुष्याला साजेश्या साध्या अभिनयाने मालिकेने घराघरात आपलं स्थान पक्कं केलं.

त्या मालिकेचे नाव आहे “ देवमाणूस ”. ज्या मालिकेने आज रसिकांना वेड लावले होते. त्यामधील डॉक्टर देवीसिंग, डिम्पल, सरू आज्जी, नाम्या, एसीपी आणि इतर सर्वच कलाकार या सर्वांनी खूप उत्तम कामे केलेली आहेत. सगळेच या मालिकेने खूपच लोकप्रिय झालेली आहेत. टीआरपी च्या बाबत ही मालिका खूप आघाडीवर होती. घराघरात या मालिकेचे आज चाहते आहेत; पण आता मालिका बराच काळ झाली चालू आहे म्हणून तिने निरोप घेतलेला आहे. कथानक न लांबवता निरोप घेणे निर्माते पसंत करत आहेत.

See also  न्यू'ड फोटो शेअर करून झाला आणि आता म्हणतायं "ख'ड्या'त गेलं सगळं", पहा अभिनेत्री वनिता खरातची ही गजब बात!

आता निरोप म्हणजे जाण्याची वेळ तेव्हा सगळेच कलाकार भावूक होणारच ना. तर त्यामधील सगळ्यांनी सोशल मिडिया द्वारे आपल्या निरोपाच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ज्यामध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या किरण गायकवाड या अभिनेत्याची पोस्ट सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.

असे काय इमोशनल लिहिलं आहे किरण गायकवाड या प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्याने की वाचून डोळे ओले होतात. कारण किरण गायकवाड या अभिनेत्याला चाहत्यांनी खूप प्रेम दिले. त्यांनीही भूमिका खूप उत्तम रित्या शेवटला नेली. खरच ! या अभिनेत्याचे कौतुक. तर आपण आज त्यांचे म्हणणं जाणून घेणार आहोत. चला तर मग.

Devmanus 4

देवमाणूस फेम प्रसिद्ध अभिनेते किरण गायकवाड शेवटच्या एपिसोड नंतर इमोशनल भावनांची पोस्ट करताना म्हणतात की “देवमाणूस मालिकेने माझी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा कार्यक्रम आणि माझी त्यातील भूमिका ही नेहमीच माझ्या जवळची राहील. कारण या भूमिकेने मला प्रेक्षकांचं अफाट प्रेम आणि पाठींबा मिळवून दिला. ही मालिका जरी प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी या मालिकेने त्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे, जे अढळ आहे.” बघितलं एखादं पात्र किंवा मालिका कलाकाराला किती काही देते.

See also  "सारे ग म प लिटिल चॅम्प" मधील या बाल गायिकेची आई सुद्धा आहे प्रसिद्ध गायिका, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

शेवटचा विशेष भाग प्रसारित होण्यापूर्वी अभिनेत्याने खूप इमोशनल रित्या आवाहन केलं की आपण चुकवू नका. पुढे काय म्हणाले अभिनेते पाहूयात. “सध्या डॉक्टर अजितकुमारच्या भूमिकेला जरी पूर्णविराम लागला असला तरी पुन्हा एकदा वेगळं काहीतरी घेऊन मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होईन. तोपर्यंत प्रेक्षकांनी अजितकुमारवर प्रेम करत राहावं आणि हा विशेष भाग जरूर पाहावा.” किरण गायकवाडला पुन्हा एखाद्या मालिकेत बघण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत. कारण त्याच्यासारखा भूमिका गाजवणारे अभिनेते खूप कमी आहेत. कारण याआधी टोटल हुबलाक आणि लागीर झालं जी मधील भय्या साहेब आपल्याला माहितीच असतील. किती लोकप्रिय झाले होते.

961D9E57E4B254B50BF8ADB7CA1F2F0D4F5F0FE77

देवमाणूस ही मालिका खरच टीम पुढे मोठा टास्कच होता. खरेतर या मालिकेचे लेखन करणाऱ्या लेखकांचे , झी मराठी आणि संपूर्ण झटणाऱ्या टीमचे मनापासून खूप खूप अभिनंदन. अश्याच उत्कंठावर्धक कथानक रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत रहा.

See also  "पंढरीची वारी" चित्रपटातील "विठोबा" आठवतो का? मूक अभिनय करून सर्वानाच केले होते थक्क...पण २००२ साली..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment