किरण माने यांच्यावर स्टार प्रवाह वाहिनीने लावले हे आरोप, महिला कलाकारांशी गैरवर्तन केल्याचा आरोप

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टेलिव्हिजनवरील “स्टार प्रवाह” वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका “मूलगी झाली हो” ही सध्या खूप चर्चेत आहे. या मालिकेतील अभिनेते किरण माने यांनी राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना चक्क मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. इतर नागरिकांप्रमाणेच किरण माने हे सुद्धा आपली राजकीय भूमिका सोशल मीडियावर मांडत असतात.

मात्र सध्या त्यांना चक्क मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्याचे कारण म्हणजे किरण यांनी आपली राजकीय प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. अभिनेते किरण माने यांच्या स्मरणार्थ अनेक कलाकार आणि नेते समोर आले. तर काही लोक हे त्यांच्या विरोधात देखील उभे राहिले. एकंदरीत आता स्टार प्रवाह वाहिनीने या प्रकरणाविषयी वाचा फोडली आहे.

See also  धनुष व ऐश्वर्या यांच्या घटस्फोटास बॉलीवुडची ही सुप्रसिद्ध अभिनेत्री जबाबदार, नेमकं सत्य काय जाणून घ्या.

किरण माने यांना मालिकेतून काढल्याप्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्टीकरण देत किरण यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इतकंच नव्हे तर वाहिनीचे म्हणणे आहे की,”एका महिला कलाकारासोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपात त्यांची मालिकेतून हकालपट्टी करण्यात आली. यासंदर्भात स्टार प्रवाह वाहिनीने म्हटले आहे की,”किरण माने यांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. अशाप्रकारे आरोप होणे, ही खरंतर दुर्दैवी बाब आहे.

किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय मालिकेतील महिला कलाकारांसह गैरवर्तन करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने घेण्यात आला आहे. त्यांचे सहकलाकार, दिग्दर्शक आणि शो च्या इतर सदस्यांच्या सततच्या तक्रारींमुळे घेण्यात आला आहे. माने यांना कित्येक वेळा ताकीद देऊन सुद्धा त्यांनी शालिनता आणि शिष्टाचार या गोष्टींचा भंग करत त्याच पद्धतीने वागणे कायम सुरु ठेवले. याच कारणामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

See also  मराठी अभिनेता भरत जाधवने केले भावनिक आवाहन म्हणाला, 'हि वेळ तर एकमेकांना आधार देण्याची पण तुम्ही तर...'

स्टार प्रवाह वाहिनीने पुढे म्हटले आहे की, आम्ही सर्व मातांचा आणि मतांचा आदर करतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या कलाकारांसाठी विषेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण ठेवण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment