“या” मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नवऱ्याने पारंपरिक दिवाळी फराळाची परदेशात विक्री करून केली करोडोंची उलाढाल…

दिवाळी म्हटलं की आपल्यासमोर येते ती दिव्यांची झगमगीत रोषणाई, फटाके आणि फराळ. दिवाळीत प्रत्येक घरात फराळ असतोच असतो मग तो कुणी घरी तयार करतो तर कुणी विकतचा आणतो. भारताप्रमाणे परदेशातही दिवाळी साजरी केली जाते.

विशेष करून परदेशी स्थायिक असलेले भारतीय, तिथेही दिवाळीतील रितीरिवाज तिथे न चुकता पाळतात. त्यामुळे दिवाळीच्या फराळाला भारतातच नाही तर विदेशातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. म्हणूनच फक्त हा दिवाळीचा पारंपरिक फराळच विकून कोट्यधीश झालेली अनेक कुटुंबही आपल्याला दिसतात.

असेच एक कुटुंब म्हणजे गोडबोले कुटुंब. या गोडबोले कुटुंबाच्या दिवाळी फराळाला थेट परदेशातून मागणी असते. आता तर गोडबोलेंच्या दिवाळीच्या फराळाची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा पती हा सगळा कोट्यवधींचा व्याप सांभाळतो.

या अभिनेत्रीचे नाव आहे किशोरी गोडबोले.आपल्या महाराष्ट्राच्या मराठी चित्रपट सृष्टी मधील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या किशोरी गोडबोले, हिचा नवरा तरुण उद्योजक श्री. सचिन गोडबोले हा एका दिवाळी फराळ विक्रीशी निगडित अशा एका अभिनव संकल्पनेमुळे चर्चेत आलाय.

सचिन आपल्याकडील पारंपरिक, घरगुती पद्धतीने तयार केलेला दिवाळीचा फराळ परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना कुरियर करतो. अस्सल पारंपरिक चवीचा दिवाळी फराळ चाखण्याचा आनंद परदेशस्थ भारतीयांना तिकडे घरबसल्या उपभोगता येतो.

श्री. सचिन गोडबोले यांचे दादर, मुंबई येथे खास मराठी घरगुती खाद्य पदार्थाचे अर्थात फराळाचे दुकान आहे. सचिन यांच्या आई, सुमती दिनकर गोडबोले ह्या पाककृतीत विशेष पारंगत त्यामुळे ह्याचा उपयोग करून त्यांनी व्यवसाय करायचा ठरवले. सुरुवातीला ५ पदार्थ विकून सुरू केलेला हा व्यवसाय आता वृद्धिंगत होऊन कोट्यवधींची उलाढाल करताना दिसत आहे.

सचिन एम.कॉम. असून जपानमधील (Essaye- Terooka) या कंपनीत उच्च पदावर नोकरी करत होता. वडिलांच्या निधनानंतर आणि केवळ आईच्या शब्दाखातर नोकरी सोडून दुकानाकडे लक्ष देण्याचे ठरवले. अद्ययावत सुविधा असलेलं गोडबोले स्टोअर्स, दादर मुंबई येथे मराठी माणसाचं घरगुती पदार्थांचं दुकान त्याने थाटलं.

बॉलिवूड सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मराठमोळी माधुरी दीक्षित डॉ. नेनेंशी लग्न होऊन अमेरिकेत स्थायिक झाली तेव्हा, तिच्या घरी याच गोडबोले स्टोअर्स चा फराळ पोहोचायचा. हळूहळू गोडबोलेंच्या या फराळाची परदेशांत राहणाऱ्या भारतीयांत अशी काही ख्याती पसरली की, या फराळाची मागणी वाढली.

पुढे त्यांनी दिवाळी फराळासोबत ड्रायफ्रुट आणि पॅकिंगमधील खाद्यपदार्थाचा देखील समावेश केला. हळूहळू व्यवसाय वाढत गेला. जे लोक गोडबोलेंकडून ऑर्डर घेत ते समाधानी असल्याने तेच त्यांच्या पब्लिसिटीचे माध्यम ठरले आणि व्यवसाय वाढत गेला.

श्री. सचिन गोडबोले यांचा विवाह मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांची कन्या किशोरी हिच्यासोबत झाला. किशोरीने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी यासारख्या हिंदी व मराठी मालिकांत काम केले होते.सचिन आणि किशोरी यांना सई आणि गौरी या दोन मुली आहेत.

किशोरी गोडबोले सध्या मराठी सृष्टीत कमी दिसत असल्या तरी हिंदी मालिकेत त्यांनी आपला चांगलाच जम बसवला आहे. किशोरी गोडबोले यांची बहीण गायिका आहे, तर वडील जयवंत कुलकर्णी हे सुप्रसिद्ध गायक होते. आजही जाहिराती आणि हिंदी मालिकांत किशोरी गोडबोले ह्या पाहायला मिळतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment