अथीया शेट्टी चढणार बोहल्यावर क्रिकेटर केएल राहुलसोबत, सुनील शेट्टीच्या घरी वाजणार सनई चौघडे..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो हल्ली नक्कीच लग्नाचा सिझन सुरू आहे, म्हणून तर सोशल मीडियावर अनेकांचे फोटो पाहायला मिळत आहेत. सनई चौघड्यांचे सगळीकडे आवाज यायला लागले आहेत. अशातच आता अभिनेता सुनील शेट्टी यांच्या घरी देखील लवकरच सनईचा आवाज ऐकू येणार आहे. अभिनेत्याची मुलगी अथीया शेट्टी जाणार नांदायला, क्रिकेटपटू केएल राहुलसोबत लवकरच अडकणार विवाह बंधनात. सोशल मीडियावर सर्व नेटकऱ्यांच्यात तिच्या लग्नाची विशेष चर्चा सुरू आहे. अथीया आणि राहुल दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.

त्यांचे खूपसे फोटो व्हायरल झाले आहेत, गेला बराच काळ ते दोघे एकमेकांना डेट करत होते. खूपच खास जोडी असल्याने अनेक नेटकरी त्यांना पसंद करतात. प्रेमाची ही दोन पाखरे आता लवकरच नात्याला पुढे नेत लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, रिपोर्ट्स नुसार लवकरच ते दोघे सप्तपदी चालणार आहेत. अथीया शेट्टी आणि सुनील शेट्टी यांचे नाते खूप जवळचे आहे, बाबा आणि मुलीचे हे नाते आता आणखीनच भावनिक बनले आहे.

See also  कित्येकवेळा आमंत्रित करूनही कपिल शर्मा शो मध्ये महेंद्रसिंग धोनी का गेला नाही? यामागील कारण ऐकून व्हाल तुम्हीपण हैरान

इंडिया टुडे सोबत बोलताना अथीया शेट्टीच्या जवळच्या एका खास सूत्राने माहिती दिली की अथीया आणि राहुल हे गेले तीन वर्षाहून अधिक काळ एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या या प्रेमाची गोष्टी अगदी जगजाहीर आहे, अनेकजण त्यांना नेहमी एकत्र पाहत असतात. सोशल मीडियावर अनेक फोटोंसह दोघेजण आपल्या नात्याची पकड जाणवून देत असतात. आता ही पकड आणखी मजबूत बनवत दोघेही येत्या तीन महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. बोहल्यावर चढण्यासाठी दोघेही तयारी सुरू करत आहेत.

दोन्ही घरची मंडळी देखील खूप खुश आहेत, नुकताच राहुलच्या पालकांनी मुंबईत अथीयाच्या पालकांची भेट घेतली आहे. घरच्यांच्या परवानगीने, आपल्या मर्जीने लग्नाची तयारी करताना दोघेही खूप आनंदी आहेत. इतकेच नव्हे तर राहुल आणि अथीया दोघेजण आपल्या पालकांसोबत त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी गेले होते. आता लग्नानंतर ते दोघे तिथेच शिफ्ट होणार आहेत. येत्या तीन महिन्यात दोघेजण लग्न करून आपला नवीन संसार तिथे थाटणार आहेत.

See also  अनिल अंबानींची पत्नी आहे ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, वडिलांच्या विरोधात जाऊन केले होते लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

हा लग्न सोहळा लवकरच मुंबई मध्ये पार पडेल, दोन्ही कुटुंबासाठी हा सोहळा अतिशय सुंदर क्षण घेऊन येणारा असेल. त्यांच्यासाठी हा एक मोठा उत्सव असणार आहे, अथीया आणि राहुलच्या आयुष्यात नेहमी असेच गोड क्षण येत राहो ही सदिच्छा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment