जाणून घ्या ‘मकरसंक्रांत’ या सणाचे पारंपरिक महत्त्व, मकरसंक्रांतमध्ये चुकूनही करू नका या चुका…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“तिळगूळ घ्या अन् गोड गोड बोला आणि हो, आमचे तिळगूळ सांडू नका व आमच्याशी कधी भां’डू नका.” आमच्या सर्व लाडक्या मित्र – मैत्रीणींना नवीन वर्षातील ह्या पहिल्या सणाच्या मकरसंक्रांत निमित्त खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो मकरसंक्रांत या सणाला आपण तिळगूळ देऊन गोड बोला, असे तर म्हणतोच.

मात्र हा सण साजरा करण्यामागील नेमका उद्देश काय? हे मात्र कित्येक जणांना ठाऊकच नसते. परंतु तुम्ही मुळीच टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हांला आपला पारंपरिक मकरसंक्रांत हा सण साजरा का करावा आणि कशाप्रकारे करावा, याची सर्व माहिती सांगणार आहोत.

आपल्या भारतीय संस्कृतीत सर्व सणांना खूप महत्त्व आहे. तसेच तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा मेळ घालणारा सण म्हणजे “मकरसंक्रांत”. आपल्या भारतीय संस्कृतीत या सणाला विशेष प्राधान्य दिले जाते. कारण या दिवशी आपण आपल्या आप्तेष्टांना “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला” असे बोलून एकमेकांतील नातेसंबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करतो.

See also  श्री शिव शंकराच्या मंदिरात नंदी का असतो? का नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात भाविक? कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्या आयुष्यातील सर्व कटु आठवणी विसरून आपण हा सण साजरा करतो. नवीन वर्षाची चाहूल लागताच मकरसंक्रांत हा पहिला सण आपण तिळगूळ आणि गूळपोळी देऊन आनंदाने साजरा करतो. जानेवारी महिना हा हिवाळा ऋतूमध्ये येतो. त्यामुळे आरोग्यासाठी देखील हा सण अत्यंत लाभदायक मानला जातो.

थंडीमुळे त्वचेतील स्नि’ग्ध’ता कमी होऊन आपली त्वचा कोरडी पडते. त्यामुळे मानवी शरीरातील उ’ष्ण’ता ही कमी- कमी होत जाते. त्यामुळे तिळ ही स्निग्धता कायम ठेवण्याचे तर गूळ आपल्या शरीरातील उ’ष्ण’ता वाढवण्याचे काम करतात. मकरसंक्रांत या सणाच्या दिवसापासूनच पुढील प्रत्येक दिवस हा तिळा- तिळाने मोठा होत जातो, असे देखील म्हटले जाते.

आपल्या भारतातील प्रत्येक राज्यात “मकरसंक्रांत” हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गुजरातमध्ये आकाशात उंच उंच पतंग उडवून तर महाराष्ट्रात नवदाम्पत्यांना आणि नुकतेच जन्मलेल्या लहान बाळांना पहिल्या संक्रांतीला हलव्याचे अनेक दागदागिने घालून हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात. नाशिक या तीर्थक्षेत्राजवळ येवरा येथे पतंग उडवून साजरा करण्याची जुनी परंपरा आहे.

See also  तिरूपती बालाजी मंदिरात दान केलेल्या केसांचे पुढे नेमकं काय होतं? पाहून विश्वास बसणार नाही...

पूर्वीच्या काळात का’टे’री हलव्याचे दागिने हे घरीच तयार केले जात असत. पण आता मार्केटमध्ये खूपच सोप्या पद्धतीने ते आपल्याला उपलब्ध होतात. तुम्हांला माहित आहे का, पूर्वीच्या काळात फक्त ब्राह्मण समाजात हलव्याचे दागिने घालण्याची पिढीजात परंपरा होती. परंतु आता सर्वच मराठी घरांमध्ये अगदी हौसेने हलव्याचे दागिने घालून मकरसंक्रांत सण साजरा करतात.

आपल्याला तर ठाऊकच आहे की, काळा रंग हा आपल्या संस्कृतीत खूप अशुभ मानला जातो. इतकंच नव्हे तर काळ्या रंगाची सावली सुद्धा आपण कोणत्या गोष्टीवर पडू देत नाही. मात्र मकरसंक्रांत हा एकमेव असा सण आहे. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आपण आवर्जून परिधान करतो.

या दिवशी सुहासिनी स्त्रिया ह्या काळ्या रंगाची सुंदर साडी आणि पुरुष काळ्या रंगाचा कुर्ता- पायजमा घालतात. 14 जानेवारीला सकाळच्या वेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यासाठी मकरसंक्रांत हा सण साजरा केला जातो. तसेच या दिवसापासूनच उत्तरायणाला प्रारंभ होतो. म्हणून उत्तराणयात सूर्यदेवतेची उपासना केली जाते.

See also  लक्ष्मी व विष्णूच्या पूजेचा योग जुळून आलाय तब्बल 19 वर्षांनी, 18 सप्टेंबर पासून सुरू होतोय आश्विन अधिक मास, जाणून घ्या शुभयोग आणि पूजनमहत्व...

सूर्य हा आषाढ महिन्यात कर्क राशीत प्रवेश करतो. तेव्हा दक्षिणायनास सुरुवात होते. तर पौष महिन्यात सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे तो दिवस मकरसंक्रांत म्हणून उजाडतो. या दिवशी स्नेहबंधाचे प्रतिक म्हणून तिळगूळ वाटण्यात येतात. मकरसंक्रांत या सणाचा कुळाचार हा तीन दिवसांचा असतो. तर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी साजरी केली जाते व मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात म्हणजेच करकरने उल्हासमय वातावरणात या सणाची समाप्ती होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment