जाणून घ्या माता कुष्मांडाची माहित नसलेली अदभूत कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

देवी कुष्मांडा माता: दुर्गामातेचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा माता. कोहळा या फळाला कुष्मांड म्हणतात. कोहळ्यात बिया जास्त असतात आणि प्रत्येक बीजामध्ये अनेक कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. सृष्टीच्या पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे हे निदर्शकच आहे. हे विश्व कोहळ्याप्रमाणेच आहे. कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे. ही दुर्गामाता कुष्मांडाच आपल्याला नवनिर्मितीची ऊर्जा देत असते.

याच दुर्गामातेने ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या दुर्गामातेला कुष्मांडा असे नाव पडले. या दिवशी साधकाचे मन “अनाहत चक्रात” स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि स्थिर चित्ताने कुष्मांडा दुर्गामातेला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. ज्यावेळी सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. या दुर्गामातेचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिच्या तेज तसेच प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे.

See also  जाणून घ्या कात्यायनी माताची माहित नसलेली अदभूत कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

या दुर्गामातेला आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावानेदेखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांत क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृतकलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. माता कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचे आजार बरे होतात, अशी मान्यता आहे. या दुर्गामातेच्या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते.

या दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे दुर्गामातेला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. माता कुष्मांडाची उपासना साधकाला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे. मानवी जीव नेहमी स्वत:मध्येच गुंतलेला असतो. त्यामुळे कधी नकारात्मक विचार, ईर्षा, घृणा त्याच्या मनात सुरू राहते. या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी सर्वसंग परित्याग करणे संसारी मानवास शक्य नसतं. त्यामुळेच या दिवसांत देवीची उपासना केल्यावर समाधान मिळतं. म्हणून ही पूजा करतात.

See also  जाणून घ्या महागौरी माताची माहित नसलेली अदभूत कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

माता कुष्मांडा पूजाविधी : एका चौरंगावर कापड घालून त्यावर माता कुष्मांडादेवीचा फोटो ठेवावा. नंतर कलशामध्ये फुले, अक्षता, कुंकू, चंदन घालून त्याची पूजा करा. त्यावर कुंकवाने पाच उभ्या रेषा काढून घ्या. नंतर गणपतीला पंचामृताने न्हाऊ घाला. विडय़ाच्या पानावर सुपारी ठेवा. त्यानंतर ‘या देवी सर्वभूतेषु माँ कुष्मांडा रूपेण संस्थिता। नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नम:॥’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा आणि आजच्या दिवशी पुढील स्तोत्र वाचा.

माता कुष्मांडा स्तोत्र :

दुर्गतिनाशिनी त्वंहि दरिद्रादि विनाशनीम्।
जयंदा धनदा कुष्मांडे प्रणमाम्यहम्
जगतमाता जगतकत्री जगदाधार रूपणीम्।
चराचरेश्वरी कूष्माण्डे प्रणमाम्यहम्
त्रलोक्यसुन्दरी त्वंहिदु:ख शोक निवारिणीम्।
परमानन्दमयी, कुष्मांडे प्रणमाभ्यहम्

माता कुष्मांडा पूजन महत्व : या देवीची पूजा केल्याने साधकाच्या सर्व रोगव्याधी नष्ट होतात, अशी मान्यता आहे. माता कुष्मांडा जन्म, आरोग्य, शक्ती आणि सौख्य प्रदान करते. तिच्या कृपेने व्यवसायात वाढ आणि कामात प्रगती, नवीन उत्पन्न प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.

See also  नवरात्री मध्ये चुकूनही करू नका हे 7 काम नाही तर दुर्गा माता होतील नाराज...

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment