‘लाडाची मी लेक गं’ मधील कस्तुरीचा नवरा आहे “हा” सुप्रसिद्ध अभिनेता, फक्त या कारणामुळे थांबलय लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आताच्या काळात मराठी फिल्म इंडस्ट्री मधील सगळ्यात जास्त चर्चेत असणारी जोडी जर कोणती असेल तर ती आहे, सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता, चॉकलेट बॉय, सिद्धार्थ चांदेकर आणि ‘लाडाची मी लेक गं’ मधील आपली लाडकी ‘कस्तुरी’ म्हणजेच अभिनेत्री मिताली मयेकर या दोघांची.

अनेकदा या दोघांना आपण काही मुलाखतीतून, सोशल मीडिया वरील फोटो, व्हिडिओ मधून सतत पहात आलेलो आहोत. अनेकांना ही ऑफ स्क्रीन जोडी आवडल्याचे लोकं सांगतात. एक हॅपी एंगेज्ड कपल म्हणून जसे ते लोकप्रिय आहेत, तसेच आजवर त्यांनी मराठी चित्रपट, नाट्य आणि टेलिव्हिजन मालिकासृष्टीत आपल्या अभिनयाने सादर केलेल्या कलाकृतींसाठीही ते लोकप्रिय आहेत.

सिद्धार्थ चांदेकरला आपण याच्या आधी झेंडा, गुलाबजाम, क्लासमेट्स, जिवलगा, वाडा चिरेबंदी या लोकप्रिय मराठी सिनेमामधील आणि रंगभूमीवरील अभिनयासाठी चांगलेच ओळखतो. मागे काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थाचा एक म्युझिक व्हिडीओ सुद्धा प्रसिद्ध झाला होता. या शिवाय ‘अप्सरा आली’ या सुप्रसिद्ध मराठी डान्स रियालिटी शो मधे सिद्धार्थ ने केलेल्या सुत्रसंचालनाचेही मराठी रसिकांनी विशेष कौतूक केले होते.

See also  शिवचा या अभिनेत्री सोबत डान्स व्हिडीओ व्हायरल, म्हणून शिव ठाकरे आणि विना जगतापचा झाला ब्रे'कअप ?

WhatsApp Image 2020 09 29 at 9.21.58 AM 1 1

मितालीचं म्हणाल तर, सध्या झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी व तिची प्रमुख भूमिका असलेली ‘लाडाची मी लेक गं’ ही मालिका अल्पावधीत मराठी रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. या शिवाय मितालीच्या यापूर्वीच्या सिनेमा, नाटकं आणि मालिकांमधील भूमिकांसाठी आपण तिला ओळखतोच. कारण याआधी तिने ‘फ्रेशर्स’ या मालिकेत तसेच ‘उर्फी’ या चित्रपटात काम केलेलं आहे. याशिवाय ‘महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर’ या डान्स रियालिटी शो मध्येही मितालीचा सहभाग होता.

मिताली आणि सिद्धार्थ यांची २०१७ मधे पहिली भेट झाली त्यावेळेस, मिताली ही ‘फ्रेशर्स’ मालिकेत भूमिका करत होती तर सिद्धार्थ त्यावेळी मराठी कार्यक्रमांचा सूत्रसंचालक म्हणून काम करत होता. सिद्धार्थ च्या कार्यक्रमाच्या सेटवर मितालीच्या फ्रेशर्स मालिकेच्या प्रमोशनच्या दरम्यान २४ जानेवारी २०१७ रोजी त्यांची भेट झाली.

See also  'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील ओमचे खऱ्या आयुष्यातील घर आहे खूपच आलिशान, घर पाहून थक्क व्हाल!

WhatsApp Image 2020 09 29 at 9.21.59 AM 1

त्यांच्या पहिल्या भेटीनंतर मग सोशल मीडियावर दोघांचे चॅटिंग सुरु झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या दोघांना चक्क हॅरी पॉटर फार आवडतो. आणि हाच नंतर त्यांच्या मैत्रीतील दुवा ठरला.

हळू हळू या नुसत्या चॅटिंग रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. शेवटी २०१८ साली सिद्धार्थ ने मितालीला लग्नासंदर्भात विचारलं आणि अपेक्षेप्रमाणे ती हो म्हणाली. आता वरील तारीख मुद्दाम सांगण्याचे कारण म्हणजे, त्या तारखेनंतर बरोब्बर दोन वर्षांनीच म्हणजे २४ जानेवारी २०१९ रोजी सिद्धार्थ आणि मितालीचा साखरपुडा झाला.

या वर्षी तर त्यांचं शुभमंगलही होणार होतं. पण या करोना संक्रमणामुळे, आणि त्यानंतर झालेल्या लॉकडाऊन व अजूनही न सुधरलेल्या या संक्रमीत वातावरणामुळे पूर्वनियोजित गोष्टी पार पडू शकल्या नाहीत.

आता कोणी म्हणेल की, सिद्धार्थ आणि मितालीच्या जवळचे घरचे, याशिवाय अगदी मोजके आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत ते छोटेखानी सोहोळ्यात लग्नं करू शकले असतेच की.

See also  “सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेमधील ही प्रमुख अभिनेत्री सेटवर ढसाढसा र'डली, कारण ऐकूण तुम्ही हैराण व्हाल!

पण, एका मुलाखती दरम्यान या विषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मितालीने सांगितले की , “आयुष्यभर जपायच्या या धार्मिक, नाजूक आणि पवित्र नात्याला प्रेमाच्या रेशमीबंधनात बांधतांना देवाब्राह्मणांचा, सग्यासोयऱ्यांचा आशीर्वाद आणि उपस्थिती महत्वाचीच. जे करायचं ते साग्रसंगीत, यथासांगच, असा आम्हां उभयतांचा पक्का विचार झाला. म्हणून आम्ही लग्नाचा शुभमुहूर्त हा परिस्थिती अनुकूल होईतो लांबणीवर टाकला आहे.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment