‘लागीर झालं जी’ मधील टॅलेंटला लोक या कारणामुळे हिणवायचे, पण आज आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता…
मित्रांनो ते म्हणतात ना ज्यांच्या अंगी कला तोच कलेचा शिलेदार! शारीरिक बाबतीत कमी असून सुद्धा कलेशी प्रामाणिकपणे कष्ट करून अनेकांची तोंडे बंद करून टाकली.
ह्या अश्या कलाकारांनचा प्रवास खूप जणांना प्रेरणादायी ठरतो आहे, कारभारी लयभारी मधून हे सिद्ध झाले की ज्याच्या अंगात कला आहे तो कधीच मागे राहत नाही त्याला कोठूनतरी जागा मिळतेच सिद्ध स्वतःला सिद्ध करायची.
झी मराठी वरील प्रसिद्ध मालिका कारभारी लायभरी मधील ३ चेहरे सध्या चर्चेचा विषय ठरतायेत, महेश जाधव, गंगा आणि दीपक साठे’ सध्या त्यांच्याकडे प्रेरणा म्हणून पाहिलं जातं.
स्वतःच्या उंचीबद्दल न विचार करता प्रेक्षकांनचे कसे मनोरंजन करता येईल ह्या दृष्टीने कलाक्षेत्रात पाऊल ठेवलेला अभिनेता म्हणजे ‘लगिर झालं जी’, मधील तुमचा आणि अगदी महाराष्ट्राचा लाडका टॅलेंट, आजपर्यंत नेहमी आपण पाहिलं असेल की उंचीने कमी असणाऱ्या लोकांकडे दुय्यम दर्जाने किव्हा मग विनोदवीरसाठी वापर म्हणुन पाहिलं जात.
टॅलेंट म्हणजेच अभिनेता महेश जाधव तो तुम्हाला ‘लगिर झालं जी’, मध्ये भय्यासाहेबच्या राइट हॅण्डची भूमिका करताना दिसला होता तर ‘कारभारी लयभारी’, मध्ये तो चक्क व्हि’ल’न म्हणून भूमिका साकारतोय.
जग्गूदादाच्या भीतीमुळे भल्यांना घाम सुटतो असं मालिकेतील त्याच्या पात्राच स्वरूप आहे, पण तुम्हाला महेशच्या अभिनयाच्या करियरबद्दल माहिती झाले असेलच पण ह्या आधी तो काय करायचं त्याने या क्षेत्राकडे कसा धाव घेतला याचा थोडासा आढावा आपण आज घेणार आहोत.
महेश जाधवचा जन्म मुळ पलटण मध्ये १५ नोव्हेंबर १९९३ रोजी झाला होता, त्याच शालेय शिक्षण सरस्वती माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुधोजी कॉलेज मध्ये पार पडला, कॉलेज पासून त्याला अभिनयाची आवड होऊ लागली मन त्याने शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे नाटकात काम केलं.
त्यानंतर अभिनयाच्या अभ्यासासाठी काही लघुपटात काम देखील काम केलं, २०१६ मध्ये त्याने एका ‘बुधिया सिंग बोर्न टू रण’, ह्या चित्रपटात काम केलं त्यानंतर त्याला खूप साऱ्या संधी चालून आल्या ह्यातूनच तो शिकत गेला आणि मग अभिनेता जितेंद्र जोशी बरोबर आणि खुप साऱ्या मराठी सुप्रसिद्ध कलाकारांन बरोबर त्याला “बगतोस काय मुजरा कर”, ह्या चित्रपटात काम मिळालं.
त्यानंतर त्याला अनेक संधी चालून आल्या आणि त्याच संधीच सोनं करत त्याने लगिर झालं जी मध्ये टॅलेंट नावाची भूमिका करून लोकांची मने जिंकली. अश्या ह्या अवली कलाकाराला आमच्याकडून शुभेच्छा! शरीराने जरी काही ठिकाणी कमी असलो तर अभिनयाने ते भरून काढणाऱ्या कारभारी लायभरी मधील जग्गूदादाला उभा महाराष्ट्र आत्ता ओळखतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.