मानधन फक्त १ रुपया, पण या १ रुपयानेच रातोरात केले सुप्रसिद्ध स्टार आणि पिक्चर झाला सुपरहिट, जाणून घ्या आपल्या लाडक्या हिरोचा हा किस्सा

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

होय! त्याच्या नवीन चित्रपटात या अवलिया कलाकाराचे मानधन होते अवघा १ नवा रुपया. पण त्याचा हा चित्रपट थिएटर मध्ये लागला आणि पुढे घडला तो इतिहास जो जाणतो, तुम्ही आम्ही आणि अवघी मराठीच नव्हे तर बॉलीवूड चित्रपट सृष्टी.

मराठी चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेला तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका “लक्ष्या” म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फक्त एक रुपयात केले होते चित्रपटात काम. त्याचाच हा मनोरंजक किस्सा…

Advertisement

EiQbidlU4AIyzKH

तर झाले असे की, मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते ज्यांनी आपल्या अभिनयाने अनेक हिंदी व मराठी चित्रपट गाजवलेले आहेत. आता तर त्यांच्या टीव्ही वरील मालिका ही गाजत आहेत असे श्री. महेशजी कोठारे आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची धमाल जोडगोळी एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीत खूप लोकप्रिय होती.

See also  "अगं ए लहान पोरं घाबरतील ना तुला" असे म्हणत अभिनेत्री श्रुती मराठे हिला केले ट्रॉलर्सने केले ट्रोल...
Advertisement

अगदी आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रुजलेत. रील लाईफ प्रमाणेच रिअल लाईफ मधे सुद्धा ते खूप जवळचे मित्र होते. तर बऱ्याच लोकांना अज्ञात असलेला हा या दोघांचा किस्सा की, लक्ष्मीकांत बेर्डेचे महेश कोठारेंच्या एका चित्रपटाचे मानधन होते फक्त १ नवा रुपया.

laxmikant 11 400x553

Advertisement

किशोर कुमार, शशी कपूर, ओम प्रकाश आणि मेहमूद अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या हिंदी चित्रपट “प्यार किये जा” चा रिमेक मराठीतून श्री. महेश कोठारेंना करायचा होता.

सर्व पात्रांची निवड झाली. सगळे तगडे स्टार जसे किशोर कुमार साठी अशोक सराफ, शशी कपूर साठी स्वतः महेशजी, ओम प्रकाशच्या जागी बाप माणूस शरद तळवलकर इ. पण मेहमूद सारख्या जबरदस्त टायमिंग आणि आचरट विनोदबुद्धीच्या कलाकाराच्या जागी त्यांना मनाजोगता कलाकारच मिळेना.

See also  सैराट फेम रिंकू राजगुरूचा डान्स करतानाचा हा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, कारण...
Advertisement

63264264

त्यावेळी हजारो प्रयोग झालेले आणि विशेष म्हणजे, महेश कोठारेंच्या आई आणि वडिलांचेच ” झोपी गेलेला जागा झाला” हे नाटक सुरु होते. मराठी चित्रपट गाजवलेले प्रख्यात विनोदी अभिनेते ज्याला “विनोदाचा बादशहा” म्हणत, असे बबन प्रभू यात भूमिका करायचे. दुर्दैवाने त्यांचे नि-ध-न झाले. आणि या नाटकात त्यांची भूमिका मग लक्ष्मीकांत बेर्डे याच्या वाटेला आली. लक्ष्या ती भूमिका धम्माल करायचा.

Advertisement

योगायोगाने महेश कोठारेंनी जेव्हा हे नाटक पाहिले तेव्हा त्यांना त्यामधील लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका इतकी आवडली की त्यांनी लगेच मेहमूदच्या भूमिकेसाठी लक्ष्याची निवड केली.

79753141

Advertisement

महेश कोठारेंचे दिग्दर्शन असलेला हा पहिलाच चित्रपट होता त्यामुळे बजेट फारच कमी होते. त्यानी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी या चित्रपटातील भूमिकेबाबत चर्चा केली. कथा आणि रोल ऐकताच लक्ष्याने होकार दिला, तत्क्षणी महेश कोठारेंनी खिशातून एक रुपया काढून लक्ष्मीकांत बेर्डेला दिला. होय…! त्याच एका रुपयात लक्ष्याने हा चित्रपट केला. चित्रपटाचे नाव “धुमधडाका”. पुढे घडला तो फक्त इतिहास… शेवटी काय? तर…” एक रुपैय्या भी बहुत बडी चीज होती है बाबू.”

See also  'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने केवळ 19 व्या वर्षी खरेदी केली महागडी कार, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close