अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या यशस्वी करियर मागे होता या “महिलेचा” हात, पाहा कोण आहे ही महिला?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं” काय मग मित्रांनो कुणाची आठवण आली, हे गाणे ऐकून..आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला मिळालेला एक अमूल्य हिरा, त्यांच्या सारखे कुणी बनले सुद्धा नाही आणि भविष्यात कधीच बनणार देखील नाही. या अवलिया कलाकाराने आपल्या भन्नाट विनोदी अभिनयाने तब्बल दोन दशकं प्रत्येक मराठी माणसाला खळखळून हसवले.

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे झपाटलेला, धु’म’ध’डा’का, थरथराट, अफलातुन, अशी ही बनवाबनवी हे कित्येक चित्रपट आजच्या काळातील तरूण पिढी देखील आवडीने पाहते. परंतु बहुतेक जणांना असे वाटते की, एवढा हास्यमय चेहरा, विनोदी अभिनयाची कला, प्रत्येक माणसाच्या मनात स्वतःची जागा बनवणे हे लक्ष्मीकांत यांना कसे बरं जमायचे, त्यांच्या या तुफानी यशामागील रहस्य नेमकं काय होतं, त्यांचे प्रेरणास्थान नक्की कोण होतं? या प्रश्नाचे उत्तर स्वतः अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून सांगितले होते.

See also  देवमाणूस मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये हा अभिनेता साकारणार डॉ. अजितकुमारची भूमिका...

63264264

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या संपूर्ण यशाचे श्रेय आपल्या आई रजनी यांना दिले. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे अतिशय गरीब परिस्थितीत गेले. आपल्या लहान मुलांना त्यांनी मोठ्या कष्टाने वाढवलं. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना स्वतःची स्वप्नं पूर्ण करता आली नाही.

तरीही त्याची खं’त त्यांच्या चेहऱ्यावर दिसली नाही. त्यांचा स्वभाव खूप समजंस होता. त्यामुळे त्या नेहमी आनंदी राहायच्या. लहानसहान गोष्टींमध्ये त्या आपला आनंद मानायच्या. अशाप्रकारे लक्ष्मीकांत बेर्डे यांना विनोदाचा वारसा आपल्या प्राणप्रिय आईकडून मिळाला. म्हणून तर त्यांना विनोद करण्यासाठी ङायलॉग्जची गरज कधीच भासली नाही.

laxmikant berde 5 20171238726

मुलाखतीमध्ये आपल्या आईच्या विनोदी स्वभावाचे दर्शन घडवण्यासाठी त्यांनी एक अफलातून किस्सा केला. एकदा त्यांची आई आजारी होती. त्यामुळे उपचारासाठी त्यांना एका रु’ग्णा’ल’या’त नेण्यात आले. पण तेव्हा ङॉक्टरांचा सं’प होता. त्यामुळे उपचारांत त्यांना बर्याच समस्या निर्माण होत होत्या.

See also  'छत्रपती ताराराणी' यांच्यावर आधारित चित्रपटात छत्रपती ताराराणी साकारणार ही प्रसिद्ध अभिनेत्री...

त्याच दरम्यान रजनी अशी हाक देण्यात आली. म्हणून लगेचच त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. पण त्यांच्या ऐवजी दुसऱ्याच एका महिलेला बोलवण्यात आले होते, हे त्यांना नंतर समजले.

25299271 1411027362339095 8482962542314597731 n

तेव्हा काही क्षणासाठी लक्ष्मीकांत आणि त्यांचे भाऊ थोङे गों’ध’ळ’ले. परंतु त्या क्षणी त्यांनी आपल्या विनोदाची किमया दाखवली. त्या जोरजोरात हसू लागल्या. कारण झाले असे की तेव्हा आतमध्ये ज्या रजनीला बोलावले गेले, त्या गरोदर होत्या. तेव्हा लक्ष्मीकांत यांच्या आई म्हणाल्या की, आता या वयात माझी ङिलीवरी करणार का? असे त्या हसत म्हणाल्या.

म्हणजे स्वतः आ’जा’री असूनही त्यांनी आजूबाजूचे वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्या आईचा हा स्वभावच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी कायम जपण्याचा प्रयत्न केला. हेच त्यांच्यासाठी खरंतर प्रेरणास्थान होते. त्यामुळेच अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या यशस्वी करियरचे सर्व श्रेय आईला दिले. पण त्यांचे हे यश त्यांच्या आई पाहू शकल्या नाहीत. हीच खंत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मनात कायम राहिली.

See also  "राजा राणीची गं जोडी" मालिकेतील रणजित ढाले पाटलाचा खऱ्या आयुष्यातल्या भाऊ आहे एका कंपनीचा मालक...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment