मातृत्व सुख आणि मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रियांनी ललिता षष्ठीचे व्रत का व कसे करावे? पूजनविधी, मंत्र,कथा इ. जाणून घ्या.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

हा सण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी च्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हे व्रत सोमवार दि. २४ ऑगस्ट २०२० रोजी केले जाईल. खुद्द भगवान श्रीकृष्णाने या व्रताचे वर्णन केले आहे.

माता ललिता दहा महाविद्यांपैकी एक आहे. त्यांना राज राजेश्वरी आणि त्रिपुरा सुंदरी असेही म्हणतात. देवी ललिता आदिशक्तीचे वर्णन देवी पुराणात सापडते. भगवान शंकरांना हृदयात धारण केल्यानंतर सती नैमिशारण्यमध्ये लिंगधारीनी या नावाने प्रसिद्ध झाली आणि तिला ललिता देवी म्हणून संबोधले गेले.

भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, “भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठीला केलेले हे व्रत शुभ आहे. यामुळे मुलांचा भाग्योदय होतो व त्यांना दीर्घायुष्य मिळते.” हिंदू धर्म पंचांगानुसार शक्ती स्वरूप देवी ललिताला समर्पित शुक्ल पक्षाच्या ललिता षष्ठीच्या दिवशी भाविक महिला उपवास ठेवतात.

See also  प्रभू श्री दत्त दिगंबरांची या 8 राशीवर पडली शुभ दृष्टी, धन संपत्तीत होईल वाढ, आनंदाने भरलेलं राहील जीवन…

हा उत्सव जवळपास संपूर्ण भारतभरात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष षष्टीच्या दिवशी वेगवेगळ्या रूपात साजरा केला जातो. या दिवशी भाविक ललिता मातेची मनोभावे षोडशोपचारे पूजा करतात. या उपवासाला मुलाबाळांच्या सुख समाधान आणि दीर्घ आयुष्यासाठी खूप महत्त्व आहे.

ललिता षष्ठी व्रत पूजन: सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्मे उरकावीत. स्वच्छ कपडे घालून घराच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेला एका कोपऱ्यात शाळीग्राम, कार्तिकेयांचे चित्र, माता गौरी आणि भगवान शिव यांच्या मूर्ती स्थापित कराव्यात. व्रतासाठी आवश्यक असणारी सर्व सामग्री एका ठिकाणी तयार ठेवली पाहिजे.

पूजन सामग्री : तांब्या-फुलपात्र, नारळ, कुंकुम, अक्षता, हळद, चंदन, अबीर, गुलाल, दिवा, तूप, सुगंधी अत्तर, फुले, दूध, पाणी, उपलब्ध असणारी फळे, सुकामेवा, नैवैद्य, आसन इत्यादी.

See also  श्री दत्त दिगंबरांच्या कृपेने या 5 राशींच्या नशिबात कुबेर योग, संपत्तीचे उघडणार भांडार, काही दिवसात बनणार धनवान…

पूजेमध्ये सर्व सामग्री परमेश्वराला भक्तिभावाने अर्पण करावी. आणि या नंतर “ओम ह्रीं षष्ठी देव्यै स्वाहा” या मंत्राने माता ललिता षष्ठी देवीची पूजा करावी. पूजनाच्या शेवटी, भक्तिभावे प्रार्थना करावी की, हे मातृत्व आणि सौभाग्य देणारी माता ललिता देवी तुला माझे शतशः नमन. मला अखंड सौभाग्य आणि मातृत्व सुख भरभरुन दे. हे व्रत सर्व मातांनी आपल्या मुलाबाळांसाठी केले पाहिजे.

ललिता षष्ठी व्रताचे महत्त्व : हे व्रत प्रत्येक महिला आपल्या पतीच्या आणि मुलांच्या संरक्षण आणि दीर्घायुष्यसाठी ठेवते. ललिता व्रताच्या दिवशी पती व मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच सुखद पारिवारिक जीवनासाठी प्रार्थना केली जाते आणि गोडधोड जेवण करून मेवा मिठाईचा प्रसाद वाटतात. चंदनउटीने विष्णू व गौरी पार्वती आणि शिव यांचे पूजन केले जाते.

See also  भगवान श्रीशिवशंकरांची या 4 राशींवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…

या ललिता षष्ठीच्या व्रताला बालसंगीष्ठी व्रत असेही म्हणतात. हे व्रत मातृत्व देते आणि मुलांचे कष्ट कमी करते. हे व्रत अतिशय शीघ्र मातृत्वफलदायी आणि शुभ आहे. जर मुलास कोणत्याही प्रकारची वेदना किंवा आजार असेल तर या व्रताने त्याचे शीघ्र निवारण होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment