लता दीदींना देण्यात आले होते ‘विष’, त्यामुळे त्यांना पुढे कधीच गाता येणार नव्हते; पुढे जे घडले ते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

स्वरसम्राज्ञनी आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज 6 फेब्रुवारी रोजी निधन झाले. मागील बर्याच दिवसांपासून त्यांची तब्येत खूप नाजूक होती. एक महिन्यापासून लता दीदी ब्रीच कँङी रुग्णालयात होत्या. तेथेच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लता मंगेशकर यांनी बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांच्या संगीतांना आपला आवाज दिला आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, लता दीदी जेव्हा 33 वर्षांच्या होत्या. तेव्हाच त्यांना कुणीतरी विष देऊन जीवंत मारण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की, “आम्ही मंगेशकर्स त्या गोष्टीविषयी अधिक बोलत नाही, कारण तो आमच्या आयुष्यातील खूप वाईट प्रसंग होता. ही गोष्ट साधारणतः 1963 मधील आहे. तेव्हा मी एवढी कमजोर होती की मला बेङवरून उठता सुद्धा येत नव्हते. त्यामुळे मला व्यवस्थित चालता देखील येत नव्हते.

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक यांचा पुढच्या दहा वर्षांत होणार घटस्फो'ट, या अभिनेत्याचा ख'ळबळजनक खुलासा...

तेव्हा ङॉक्टरांनी लताजींना सांगितले होते की, त्यांना पुन्हा कधीच गाऊ शकणार नाही. त्यावर लताजी त्यांना म्हणाल्या की,”नाही, हे बरोबर नाही.” परंतु माझे फॅमिली ङॉक्टर आर. पी. कपूर यांनी खात्रीशीरपणे मला सांगितले की, मी तुम्हांला पूर्णपणे व्यवस्थित ठीक करेन. कारण मी माझा आवाज गमावला नव्हता. तब्बल तीन महिने उपचार पूर्ण घेतल्यावर मी पुन्हा माझ्या रेकॉर्डिंगला सुरुवात केली होती. या एवढ्या मोठ्या संकटानंतर लता मंगेशकर यांनी पहिले जे गाणे गायले ते म्हणजे “कहीं दीप जले कहीं दिल जले!” त्यांचे हे गाणे एवढे हिट झाले होते की त्यांना या गाण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.

याविषयी लता दीदींनी सांगितले की,”हेमंत दा माझ्या घरी आले आणि ते माझ्या आईची परवानगी घेऊन मला रेकॉर्डिंगसाठी घेऊन गेले. मात्र माझ्या तब्येतीत थोडासा जरी बदल जाणवला तरीही ते मला लगेचच घरी आणून सोडतील, असा शब्द त्यांनी आईला दिला होता. नशीबाने ते रेकॉर्डिंग खूप छान झाले आणि मला त्याचे भरपूर समाधान मिळाले.”

See also  धर्मेंद्र सोबत लग्नानंतर हेमा मालिनीला झाला होता पश्चाताप, स्वतः हेमा मालिनीने केला खुलासा...

जेव्हा लता मंगेशकर यांना तुम्हांला विष कुणी दिले, तुम्हांला माहीत आहे का? याविषयी विचारण्यात आले. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, हो आम्हांला याविषयी पूर्ण कल्पना आहे. परंतु तरीही आम्ही काहीच पाऊल उचलले नाही. कारण आमच्याकडे त्या व्यक्तीविषयी कोणताही ठोस पुरावा नव्हता.” लता मंगेशकर यांना आपल्या संपूर्ण आयुष्यात खूप कठीण संकटांना तोंड द्यावे लागले. जेव्हा त्या 13 वर्षांच्या होत्या, तेव्हाच त्यांच्या वङिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हापासूनच लता दीदींनी आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माच्या या बॉडीगार्डला मिळतो एवढा पगार, रक्कम ऐकून थक्क व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment