लता दीदींनी आयुष्यभर निभावले मोठ्या मूलीचे कर्तव्य, भावंडांचे केले अशाप्रकारे त्यांनी संगोपन

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

गानकोकिळा लता मंगेशकरजी आज आपल्यातून निघून गेल्या. मात्र त्यांच्या आठवणी निरंतर काळापर्यंत आपल्या मनात कायम टिकून राहतील. लता मंगेशकर या एक अशा व्यक्ती होत्या, ज्यांना देशातील बहुसंख्य लोक पसंत करत होते आणि पसंत करत राहतील. लता दी या आपल्या कुटूंबाच्या कर्त्याधर्त्या होत्या.

लता मंगेशकर यांना पाच बहीण- भावंडं आहेत. यामधील लता मंगेशकर या सर्वांत मोठ्या होत्या. त्यांच्या इतर बहिणींचे नाव उषा, आशा, मीना आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर आहे. या सर्व भावंडांना संगीताची खूप आवङ आहे. त्यामुळे त्यांनी संगीतालाच आपले उपजीविकेचे साधन केले आहे.

लता मंगेशकर यांच्या वङिलांचे 1942 मध्ये निधन झाले होते. लता दीदी जेव्हा 13 वर्षांच्या होत्या. तेव्हापासूनच त्यांनी आपल्या कुटुंबाचा भार पेलायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या कुटूंबाच्या जबाबदारीमुळेच त्यांनी कधी लग्न केले नाही व त्या आजन्म अविवाहित राहिल्या.

See also  नॅशनल क्रशचा रेड हॉट फोटोशूट होतोय व्हायरल... चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले रश्मीकाने पुन्हा एकदा..

तर लताजींची लहान बहीण आशा भोसले हिने 16 व्या वर्षातच लग्न केले व त्यांना आता तीन मुलं आहेत. लताजींची तिसरी बहीण मीना मंगेशकर ही सुद्धा प्लेबॅक सिंगर आहे. तिने सुद्धा अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतील गाणी गायशली आहेत. चौथी बहीण उषा मंगेशकर हिने सुद्धा लतादीदींसारखेच लग्न केले नाही व आजन्म अविवाहित राहायचे ठरवले. तिने हिंदी, नेपाली, गुजराती आणि भोजपुरी भाषांतील अनेक गाणी गायली आहेत.

लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी शास्त्रीय संगीतात स्वतःची अशी एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांना लाडाने सर्वजण बाळासाहेब म्हणतात. हृदयनाथ मंगेशकर यांना दोन मुलं एक मूलगी आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या सर्व कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसला आहे.

See also  लता मंगेशकर यांची प्रकृती गंभीर, ताबडतोब ICU मध्ये दाखल; कोणालाही भेटण्याची परवानगी नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment